Last Updated on 04 Feb 2024 8:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रश्न क्र.६
मागील प्रश्नात वास्तू,आकार,प्लव,वाढ ,कट,भूमी परिक्षण,या संदर्भात सर्व काही समजले माझा आता असा प्रश्न आहे कि,
मी बऱ्याच ठिकाणी पाहतो,
वास्तुसाठी भूमी निवड केल्यानंतर भूमी शुद्धीसाठी,वास्तूत देशी गाय सोडतात,गोमूत्र शिंपडतात याला कितपत ग्रंथाधार व शास्त्रीय आधार आहे.?
उत्तर
हो,नक्कीच याला ग्रंथाधार आणि शास्त्रीय आधार आहे.
भूमी शुद्धीसाठी मनुस्मृतीकार सांगतात,
सम्मार्जनोपाञ्जनेन सेकेनोल्लेखनेन च।
गावां च परिवासेन भूमी: शुध्यति पञ्चभि:॥(मनुस्मृती ५, २२४)
स्वच्छ करणे ,गोमूत्र ,गंगाजल इत्यादी शिंपडणे, लिंपून घेणे, सिंचन करणे,खोदणे,आणि गाईंना बांधणे इत्यादी पाच प्रकारांनी भूमी शुद्ध होते.
राजवल्लभ ग्रंथात भूमी शुध्दीचा संदर्भ – सांगतांना ग्रंथकार म्हणतात,
परिक्ष्य भूमीमुपसेचग्रेत् तां सुपञ्चगवेन ततो विलेख्या ।
रेखा सुवर्णेन मणिप्रवाले:पिष्टाक्षतैर्वापि पुनस्तदूध्वे॥२१॥
भूमी परीक्षण करून भूमीमध्ये
पंचगव्य म्हणजे गोमुत्र,शेण,दूध, दही , तुपाचे सिंचन करावे.(देशी गाईचे)त्यानंतर सुवर्ण मणी ,प्रवाळ व तांदळाने (अक्षदा)रेघा माराव्यात.
मयमतम् ग्रंथात भूपरिग्रह अध्याय (अ.४,४ ते ७) उल्लेख आहे.
बांधकामासाठी भूमी निवडीनंतर भुमीत बैल, गाईवासरु सोडावे. म्हणजे जमिनीवर गोमूत्र, शेण पडून जमीन तुडवली जाते आणि गाईच्या श्वास उच्छवासामुळे निर्माण होणारा वास, व बैलाच्या हंबरल्यामुळे निर्माण होणारा नाद आणि वासराच्या ,तोंडातून जमीनीवर पडलेल्या लाळेच्या फेसाने जमीन सुपीक ,शुद्ध आणि पवित्र होते.
मानसार ग्रंथ( अ.५,५ते ६) मध्ये देखील बैल, गाई ,वासरु याचं महत्त्व भूमी शुद्धीसाठी वरीलप्रमाणेच सांगितले आहे.
घेरंड संहिता अध्याय पाच श्लोक सात मध्ये घेरंड ऋषी सांगतात,
सम्यग्गोमयलिप्त च कुटिरं तत्र निर्मितम्।
एवंस्थानुेषु गुप्तेषु प्राणायामं समभ्यसेत्॥
प्राणायामाचा अभ्यास करण्यासाठी,
गाईच्या शेणाने नीट सारवलेल्या भिंती असलेल्या कुटीची निर्मिती करावी.
हट्ट प्रदीपिका ग्रंथात(अ.१,१३) योगाभ्यासासाठी जागा कशी असावी ,हे सांगताना ग्रंथकर्ते स्वामी स्वात्माराम म्हणतात,
सम्यग्गोमयसान्द्रलिप्तममलं नि:शेषजनतूज्झितम् ॥
भूमी गाईच्या शेणाने सर्व उत्तम तऱ्हेने सारवलेली स्वच्छ व पूर्ण निर्जंतुक असावी.
इथे देखील गाईला किती महत्त्व आहे हे लक्षात येते.
गोमय वसते लक्ष्मी गोमुत्रामध्ये धन्वंतरी

गोमय म्हणजे अर्थात गाईचे शेण’ दूध,दही,तूप. यामुळे वेद, पुराणकाळापासून असणारे देशी गाईचे धार्मिक महत्त्व यावर बरेच प्रयोग झाल्यामुळे,आज एकविसाव्या शतकात तर गाईचे महत्व आणखीनच वाढत आहे.गाईच्या पाठीवरून हात फिरवणे व गाईचे डोळे पहाणे हे किती आल्हादायक असते, ही प्रत्यक्ष अनुभूती नंतर लक्षात येते.गोमुख शांतीच्या वेळेला तर लहान बाळाला गाईला हुंगायला देणे हे आरोग्याच्या दृष्टीने गायीचे सान्निध्य किती महत्त्वाचे हे लक्षात येते.
कृषिवत्सल देशात सेंद्रीय शेती त्याचबरोबर कीटकनाशक म्हणून गोमूत्राचा वापर केला जातो.
दि.२७/१२/२०२१रोजी पेठ जि.सांगली येथे यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत, वार्षिक ४००कोटि ची उलाढाल आसणारे, शेतकरी अभिनव फार्म चे संस्थापक श्री.ज्ञानेश्वर बोडके यांचे एक एकर शेती या विषयावर व्याख्यान झाले.
त्यात त्यानी कीटकनाशक म्हणून गोमुत्राला अनन्यसाधारण महत्त्व महत्त्व असल्याचे सांगितले.
आपले पूर्वज गाईला देवता मानून,गाईवासराला आपल्या भूमीत सोडत,तोंडातील फेस शेण, मूत्रविसर्जन भूमी शुद्धीसाठी किती शास्त्रीय (वैज्ञानिक ) आहे हे या वरुन लक्षात येते.
प्रश्न क्र .७
मागील प्रश्नात वास्तू,आकार,प्लव,वाढ ,कट,परीक्षण ,भूमीशुद्धी या संदर्भात सर्व काही समजले माझा आता असा प्रश्न आहे कि,
बांधकामांसाठी जमीन ताब्यात घेण्यापूर्वी कोणता विधी करावा?
फारच छान प्रश्न आहे,
उत्तर
बांधकामासाठी वास्तूची निवड झाल्यानंतर, भूपरिग्रह अर्थात भूमी अधिग्रहण म्हणजे भूमीचा ताबा घेणे,हा विधी शास्रात सांगितला आहे.
जमिनीचा ताबा घेताना विद्वान स्तपती (इंजिनिअर,आर्किटेक्चर,वास्तुसल्लागार ,बिल्डर,कॉन्ट्रॅक्टर गवंडी,अन्य कारागीर )यांचा आदर सत्कार आणि तेथील जीवजंतु,पशुपक्षी याची क्षमा मागणारा विधी किती आवश्यक आहे हे समजते.

भूमी अधिग्रहण विधी अपक्रामन्तु भूतानि देवताश्च सराक्षस:।वासान्तरं व्रजन्त्वस्मात् कुर्यांभूमी परिग्रहम्॥
कारण आपल्या बांधकामामुळे ,त्या भूमीतील जीवजंतूंचा आणि प्राणी पक्ष्यांचा निवारा नष्ट होणार असतो.आणि एखाद्याचा निवारा नष्ट करणं हे किती वाईट गोष्ट आहे.तसेच वास्तूंसाठी जागा निवडल्यानंतर त्या वास्तूत आपल्या मनाप्रमाणे आपल्या सोईचे शास्त्रशुध्दभवन उभा राहणार असते.आपली आवश्यकता व सूत्रधाराची कल्पना यातून सुंदर घराची निर्मिती होणार असते, म्हणून सूत्रधार खूष असेल तर हे शक्य आहे.पण बऱ्याचवेळा असे होताना दिसत नाही.
बांधकामाच्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर कामगार ,मालक याच्याशी वाद होताना दिसतात काही ठिकाणी वास्तू व्हिजिटला गेल्यानंतर असे निदर्शनास येते.मालक स्वतः कारागीराच्या अंगावर गेल्याचे मी स्वतः पाहिले आहे.तर हे योग्य नाही.कारण घर बांधत असताना घरमालकाला प्रचंड ताणतणाव असतो.बऱ्याच अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते.त्यातील काही गोष्टी वेळेवर झाल्या नाही तर मालकाला त्रास होण्याची शक्यता असते,हे जरी बरोबर असले तरी घरमालकाने संयम ठेवणे गरजेचे अाहे,असा माझा स्वत:चा अनुभव आहे ,कारण मी दीडहजार स्क्वेअर फीट एक वर्षभर घर बांधत असताना मी स्वतः अनुभवले आहे.
पण जर आपल्या वास्तूत सुख, समाधान ,शांती आपले आरोग्य चांगले रहावे असे वाटत असेल तर घरमालकाने हे टाळणं आणि प्रत्येक कारागीरांचा आदर ठेवणे आवश्यक आहे असे मला वाटते.
कारण,
वास्तुशास्त्राच्या प्रमाण मानलेल्या मयमतम ग्रंथात ,अध्याय चार मध्ये सांगितले आहे.
विद्वान स्तपती यांचा आदर सत्कार करून तेथील देवतांना आवडणारा प्रसाद (बली-त्यांना आवडणारा प्रसाद )अर्पण करून मंत्र घोषामध्ये भूमित प्रवेश करुन,
अपक्रामन्तु भूतानि देवताश्च सराक्षस: ।वासान्तरं व्रजन्त्वस्मात् कुर्यात्भूमी परिग्रहम्॥
अर्थात या ठिकाणी भूत,देव,राक्षस जे काही सर्वजन इथे राहतात त्यांना विनंती आहे, त्यांनी येथील निवारा सोडून अन्य ठिकाणी जावे.मी जमिनीचा ताबा घेत आहे.
मानसार अ.५,२ मध्येही तेच सांगितले आहे,
गच्छन्तु सर्वभूतानि राक्षसा देवता अपि।
अस्मात्स्थानांत्तरं यायात्कुर्यात्पृथ्वीपरिग्रह॥
इथे राहणारे सर्व जीव राक्षस व देवता अन्य ठिकाणी जाऊन आपला निवास बनवा.
मनुष्यलय चंद्रिका ग्रंथात ही हेच सांगितले आहे.
क्रमश:
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…मागील भाग
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
वास्तु म्हणजे काय ?











































































