Last Updated on 02 Feb 2024 7:13 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांची नियुक्ती नुकतीच बदली झाली असून ते आता पुणे ग्रामीण अंतर्गत असणाऱ्या यवत पोलीस ठाण्याचे ठाणेदार झाले आहेत.
पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी सुमारे 2 वर्षे मिरज ग्रामीणच्या पोलीस निरिक्षकपदी काम केले.त्यानंतर त्यांची नुकतीच पुणे ग्रामीणला बदली झाली होती.त्यानंतर बुधवारी त्यांची यवत पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.
देशमुख यांनी यापूर्वी इस्लामपूर येथे पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे.या काळात त्यांनी इस्लामपूर परिसरात सर्वाधिक मोक्का कारवाया,तडीपारीचे गुन्हे,शहरात सीसीटीव्ही अशा अनेक मार्गाने खासगी सावकारी,गुंडगिरी यांच्यावर वचक ठेवला.मोक्का,एमपीडीए,तडीपारीच्या कारवाया केल्या.शहर व परिसरातील गुन्हेगारीला आळा घालून कडक कारवाया करण्यासाठी अतिशय निष्ठेने वेळ देवून निरीक्षक देशमुख यांनी प्रॉपर पोलिसींग केले.
प्राचीनतेबरोबरच निसर्गाचं वरदान लाभलेले बेट; एकदा तरी भेट द्या!
पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक पदक मिळाले आहे. निरीक्षक देशमुख यांनी आपल्या 20 वर्षाच्या सेवेत केलेले अनेक गंभीर व किचकट गुन्ह्यांचे तपास,बाल व महिला लैंगिक अत्याचार प्रकरण,चोरीचे गुन्हे तसेच इस्लामपूर येथील विद्यार्थ्याच्या अपहरण प्रकरणाचा यशस्वी तपास केले आहेत. यापुर्वीही त्यांना चांगल्या सेवेबद्दल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन 1999 मध्ये ते पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. सन 2009 मध्ये सहाय्यक पोलीस निरिक्षक तर सन 2014 ला पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली.गडचिरोली,रायगड,ठाणे,मुंबई येथे यापुर्वी त्यांनी सेवा बजावली आहे.













































































