Last Updated on 16 Oct 2023 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
पुणे । यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून १७ ते १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगदा कि.मी ४७/९०० व लोणावळा कि.मी. ५०/१०० येथे,
१८ ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी कि.मी. ४४/८०० व खालापूर कि.मी. ३३/८००,
१९ ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. ३७/८०० व कि.मी. ३७,
२६ ऑक्टोबर रोजी खंडाळा बोगदा कि.मी. ४७/१२० तर खोपोली एक्झीट कि.मी. ३९/९०० वर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे.
काम पुर्ण झाल्यावर दुपारी १ वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे.
![]()
शेतरस्ते,पाणंद रस्त्याप्रश्नी महसूल मंत्र्यांनी तहसीलदारांना दिले हे महत्वपूर्ण निर्देश
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता…जाणून घ्या !
अधिकारी-कर्मचारी ‘चाय पे’ चर्चेत मस्त अन् जनता होतेय हेलपाट्याने त्रस्त !
Navratri 2023 : देवी नवरात्रातील विज्ञान आणि शंका समाधान
बहे रामलिंग बेटावर भाविकांची वाढती गर्दी
![]()











































































