Last Updated on 27 Aug 2022 3:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भाद्रपद महिन्यातील मध्याह्न व्यापिनी चतुर्थी म्हणजेच विनायकी चतुर्थी प्रमाणे *प्रातः कालापासून मध्यांह्नापर्यंत कोणत्याही वेळी गणपती स्थापना करावी.
यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते.बऱ्याच वेळा सोशल मीडियावर मुहूर्ताचा ऊत आल्याचाही आपणास दिसतो.उदा.विशिष्ट नक्षत्र, योग वैधृती व्यतिपात ,विष्टीकरण इ. वर्ज्य नाहीत म्हणून ते पाहू नये असे शास्त्र सांगते.
उजव्या सोंडेचा गणपती चांगला,डाव्या सोंडेचा गणपती वाईट असा समज करून घेणे,पूर्ण चुकीचे आहे.कारण समर्थ रामदास स्वामी म्हणतात,सरळ सोंड वक्रण्तुड त्रिनयना
त्याच बरोबर सोंड कुणीकडे करायची ते मूर्तीकाराच्या कलात्मकतेचा भाग आहे.
शास्त्रानुसार स्थापनेसाठी वीतभर उंचीची आसनस्थ मूर्ती असावी.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी आपल्या काही अडचणीमुळे त्याची स्थापना करता आली नाही ,तर इतर कोणत्याही दिवशी ,इतर दिवशी स्थापना करता येणार नाही. मग एखादे वर्षे लोप झाले तरी चालेल.
गणेश मूर्ती त्याच दिवशी आणली पाहिजे असे नाही तर दहा-पंधरा दिवस अगोदरही आणून ठेवली तरीही चालते .
काही वेळा हरतालिका आणि गणपती एकाच दिवशी येतात अशावेळी कोणती पूजा अगोदर आणि कोणती पूजा नंतर करावी असा संभ्रम होतो .तरी कोणतीही अगोदर आणि कोणतीही नंतर करू शकता. असे शास्त्र सांगते .
पूजन दीड दिवस ,पाच दिवस सात दिवस, दहा दिवस करता येईल.
घरामध्ये गर्भवती स्त्री असता गणेशमूर्ती विसर्जित केली जात नाही तर ही प्रथा अज्ञानमूलक आणि चुकीची आहे.गणेश मूर्ती विसर्जित करावी असे शास्त्र सांगते.
मूर्तीचे विसर्जन पाण्यात करावे असे असल्यामुळे बादलीत, हौदात, जलाशयात विरघळणे आवश्यक असते. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तीन ते चार इंच उंचीचीच आणि विरघळणाऱ्या मूर्तीचीच निवड करावी. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस, धातूची इ. उत्सव मूर्ती म्हणून ठेवण्यास काहीच हरकत नाही. मात्र उत्सव मूर्ती विसर्जित न करता शोकेस मध्ये ठेवून द्यावी.
गौरी गणपती उत्सव वर्षातून एकदाच येत असतात आणि या उत्सवाची अनेकाना हौस असते. आणि त्या वेळेला नेमके भावकीचे सोयर /सुतक तसेच घरी मासिक धर्माची अडचण होते.तर जन्म ही घटना आनंदही असल्यामुळे माता पित्याला फक्त दहा दिवस सोयर इतर कुणालाही नाही.
त्याचबरोबर अशावेळी मासिक धर्म लांबवण्यासाठी औषधे गोळ्या घेतल्या जातात आणि पुढील काळात त्याचे दुष्परिणाम व त्रास भोगावे लागतात. हे टाळण्यासाठी , दाते पंचांग कर्ते,अनंत दाते यांनी प्रकाशित केलेल्या२१व्या शतकातील कालसुसंगत आचारधर्म या ग्रंथात अभ्यास पूर्ण विचार मांडले आहेत. अगदी सविस्तर विचार या लेखात मांडता येणार नाहीत पण थोडक्यात,गोमूत्र प्राशन आणि गोमूत्र व तुळशीचे पान पाण्यात टाकून स्नान करावे. तुळशीचे पान खावे. त्याच बरोबर प्रत्येकाच्या घरात सोनं असतं पेलाभर पाण्यात टाकून पाणी पाच मिनिटे उकळावे आणि ते सुवर्ण जलसिद्ध जल ,एक चमचाभर प्राशन करून अशा कार्यासाठी पवित्र होता येते.
वरील ग्रंथानुसार भावकीतल्या सुतकाचा विचार इथे सविस्तर मांडता येणार नाही मात्र अगदी आपल्या घरी राहणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले तर मात्र दहा दिवसापर्यंत गणपती बसवू नये.
गणपती बसवल्यानंतर सुतक आले तर पूजन दुसऱ्याकडून करून घेऊन लगेचच मूर्ती विसर्जित करावी. इतरनी शुद्धीसाठी वरील गोष्टीचा विचार करावा.
स्थापना केलेली मूर्ती उत्सवाच्या दिवसात काही कारणामुळे दुखावली ,भंगली असेल तर लगेचच विसर्जित करावी. त्यानंतर पुन्हा गणेश मूर्ती मात्र आणून बसू नये.
या वर्षात घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले म्हणून काही लोक गणपती बसवत नाहीत तर ही प्रथा अज्ञानमूलक आहे.आरास न करता साध्या पद्धतीने मूर्ती बसवायला हरकत नाही.
गणेश मूर्तीचे विसर्जन मंगळवार अथवा कोणत्याही वारी तसेच कोणतेही नक्षत्र असताना केले तरी चालते.
या वर्षी बुधवार दिनांक ३१ऑगस्ट २०२२ रोजी मध्याह्न पर्यंत म्हणजे दुपारी दीड पर्यंत गणेश स्थापना करावी असे शास्त्र सांगते.
( संदर्भ: दाते पंचांग)
अध्यात्म शास्त्रात गणपतीलाच ओंकार म्हंटलेलं आहे. पातंजल योग दर्शनात पतंजली मुनी म्हणतात,
तस्य वाचक:प्रणव: ||तज्जपस्तदर्थ भावनम्||
माझ्या मते खरंतर पूजा ही देवासाठी नसून आपल्यासाठी असते.आणि ईश्वर आपल्या अंतरात्म्यात असल्यामुळे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, मूर्तीच्या समोर बसून ओंकार जपाने , आपल्या अंतर्मनातील षडरुपी काजळी काढून टाकने आणि मूर्ती विसर्जनानंतर ही ईश्वरी आत्मज्योतीच्या प्रकाशाची अनुभूती घेत राहणे म्हणजे खरी गणेश पूजा होय.
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…मागील भाग
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
वास्तु म्हणजे काय ?









































































