Last Updated on 28 Jul 2022 12:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
दीप पूजा
आज आषाढ अमावस्या. दीप अमावस्या. अर्थात दिवे घासून पुसून स्वच्छ करून, दीप पूजन करून, दीप प्रज्वलन करण्याचा दिवस.
खरंतर या अमावस्याचे वैज्ञानिक महत्त्व पाहता,आषाढ अमावस्याची दीपपूजा म्हणजे अंतर्मनातील विकाररुपी जळमटे काढण्याची खरी पूजा होय.
अंतर्मनातील राग,काम ,क्रोध मध, मोह, मत्सर हे विचार काढून टाकून सुख ,समाधान, शांती आनंद प्राप्त करण्याचा दिवस म्हणजे दीपपूजा.
पातंजलयोग दर्शन या ग्रंथात साधन पादात, ५२व्या सूत्रात ,पतंजली मुनी म्हणतात,
तत:क्षीयते प्रकाशावरण l
त्यामुळे प्रकाशाच्या आड येणारे आवरण नाहीसे होते, अर्थात ज्ञानावरील पडदा ,आवरण दूर होऊन ज्ञान प्राप्त होते.
आपल्या अंतर्मनात मुळता प्रकाशच प्रकाश आणि उजेडच उजेड आहे. फक्त अज्ञानामुळे त्यावरती काजळी साठलेली आहे.जसे आपण दिवे साफ करतो, कंदीलाची काच साफ करतो .आत प्रकाश असतोच पण काचेवरील काजळीमुळे आपणास तो दिसत नाही. त्याप्रमाणे अंतर्मनातील अज्ञानाची काजळी काढून टाकून ज्ञानाची ज्योत प्रज्वलीत करून आत्मानुभूतीचा आनंद घेण्याचा दिवस म्हणजे आषाढ अमावस्येची खरी दीप पूजा होय.
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…मागील भाग
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
वास्तु म्हणजे काय ?









































































