Last Updated on 26 Aug 2022 12:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
“ॐ”
हरितालिका व्रत
हरितालिका व्रत म्हणजे काय,तर हरतालिका व्रता मध्ये उमा (पार्वती)सहित शंकराचे पूजन केले जाते अर्थात शंकर पार्वती पूजन म्हणजेच शिवशक्तीची उपासना होय.
हे व्रत भाद्रपद शुक्ल उदयव्यापिनी तृतीया असेल ,किंवा अहोरात्र असता ,उर्वरित तृतीया दिवशी, सूर्योदयापासून मध्याह्न समाप्तीपूर्वी म्हणजे दुपारी दीड पर्यंत, हरितालिका पूजन करावे असे शास्त्र सांगते.
अर्थात पूजनाच्या वेळी तृतीया पाहिजेच असे नाही.
या साठी वेगळा मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते.
हे व्रत का आणि कशासाठी केले जाते.तर हे व्रत सौभाग्यदायक आहे म्हणून सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्राप्तीसाठी करतात. त्याच बरोबर कुमारिका आपणास चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत्त करताना दिसतात.
माझ्या मते विश्वाचा नायक परमात्मा याला वंदन आणि कुटुंबाचा भार उचलणारा कुटुंबाचा नायक आपला जोडीदार पती तो जर आरोग्य संपन्न असेल तर आपल्या कौटुंबिक जीवनाचा प्रवास सुखमय ,संपन्न व्हवा ,म्हणून आपल्या भारतीय स्त्रिया पूर्वीपासून सौभाग्यप्राप्तीसाठी हे करताना दिसतात.
या वर्षी भाद्रपद शुक्ल-३ मंगळवार ,दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी मध्याह्न समाप्ती पर्यंत म्हणजे दुपारी १.३० पर्यंत पूजन करणे शास्त्र सहमत आहे.
ओम नमः शिवाय!
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…मागील भाग
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
वास्तु म्हणजे काय ?











































































