Last Updated on 27 Jan 2022 1:15 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मागील प्रश्नात वास्तु,वास्तुआकार,भूमीप्लव,वाढ ,कट,परीक्षण,भूमीशुद्धी,भूमी अधिग्रहण,आय व्यय,वास्तु मुहूर्त इ. संदर्भात समजले.
माझा आता असा प्रश्न आहे की,
प्रश्न.क्र.१०
प्रत्यक्ष भूमिपूजन करुन प्रथमतः कोणत्या दिशेतून पाया खणण्यास आरंभ करावा?
उत्तर
ज्योतिर्मयुख ,राजवल्लभ इत्यादी ग्रंथात या संदर्भात काही वेगळे विचार मांडलेले आहेत ,पण मुहूर्त शास्त्राच्या मान्यवर ग्रंथात मात्र शेष मुख व राहू मुखाचा विचार करून पाया खणावा असे सांगितले.
कारण ,निसर्ग चक्रानुसार काल्पनिक सूर्याच्या भ्रमणानुसार प्रत्येकवेळी राहूमुखाची स्थिती बदलत असते.
सूर्याच्या राशीनुसार सांगितलेल्या दिशेत पाया खणावा.
सूर्य कोणत्या राशीत आहे हे पाहून खाली सांगितल्याप्रमाणे पाया खणणे आवश्यक असते.
राहुमुखावर पाया खणल्यास विनाश,
पाठीवर खणल्यास माता,पिता यांना कष्ट,
शेपटीवर खणल्यास पुत्रनाश संभवतो.
काल्पनिक राहूच्या पोटात पाया खणने शुभदायी असते.
विश्वकर्मा विद्या प्रकाश ,विश्वकर्मा प्रकाश,तसेच या संदर्भात मुहूर्तचिंतामणी या ग्रंथात राम दैवज्ञ म्हणतात,
देवालयेगेहविधोैजलाशयेराहोर्मुखंशंभुदिशोविलोभत:॥
मीनावर्कसिंहार्कमृगार्कतस्त्रिभेखातेमुखात्पृष्ठविदिक् शुभाभवेत् ॥१९॥
देवालये गृह व जलाशय यांच्या आरंभाचे वेळी ज्या ज्या राशीला सूर्य असेल त्यावरून ईशान्यादि विदिशेला राहूमूख असते ते पुढच्या कोष्टकावरून जाणावे.
राहूमुखापासून पृष्ठ दिशा म्हणजे ज्या दिशेला राहुमुख असेल तिच्या पाठीमागची दिशा जमीन खणण्यास आरंभासाठी शुभ होय.
देवालये आरंभ करणे असेल तर, मीन ,मेष ,वृषभ या तीन राशीला सूर्य असता, राहुमुख ईशान्येला असते म्हणून तिच्या पाठीमागच्या दिशा जी अाग्नेय तिकडे खणण्यास आरंभ करावा.
राहूमुख वायव्येला असता ईशान्य दिशेकडे खणण्यास आरंभ करावा. इत्यादी जाणावे.
राहूचे ईशान्येला जेव्हा मुख असते तेव्हा त्याचे वायव्येला उदर व नैऋत्येला पुच्छ असते म्हणून ,त्यावेळी आग्नेय दिशा शुभ असते.
म्हणजेच सूर्य कोणत्या राशीत आहे हे पाहून सांगितलेले दिशेत पाया खणावा.राहूमुख कोष्टक श्लोक ॥१९॥ मुहूर्तचिंतामणी ग्रंथानुसार खालील प्रमाणे.


अर्थात वरील कोष्टकात सांगितल्याप्रमाणे राहू मुखाच्या दिशेचा विचार करून अधोमुखी नक्षत्रावर पाय खणावा.
प्रश्न.क्र.११
गृहारंभ मुहूर्त,म्हणजेच प्रत्यक्ष नंदा प्रतिष्ठापना /शिलान्यास प्रथम बांधकामास आरंभ( सुरुवात) कोणत्या दिशेतून करावा?
उत्तर
वास्तुशास्त्राच्या अनेक ग्रंथात बांधकामाची प्रत्यक्ष सुरुवात आग्नेय कोपऱ्यातून करावी असे सांगितले आहे.
वास्तू रत्नावली श्लोक ९४ मध्ये म्हटले आहे,
दक्षिणपूर्वे कोणे कृत्वा पूजां शिलां न्यसेत्प्रथमम्।
शेषा: प्रदक्षिणेनैव स्थम्भाच्श्रैवं समुत्थाप्या:॥
दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात पहिली शिळा स्थापन करून,उर्वरित शिळा प्रदक्षिणेच्या क्रमानुसार स्थापन कराव्यात.
घरामध्ये अपेक्षित असणार्या स्तंभाची स्थापना ही अशाच प्रकारे प्रदक्षिणा क्रमानुसार करावी.
अर्थात दक्षिण-पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेस गृहारंभ मुहूर्त करावा असे म्हंटले आहे.
नंदा प्रतिष्ठापना करून म्हणजे स्वस्तिक स्थापना करून,धान्य धातू, औषधी व सुगंधी द्रव्ये ठेवून, आत्ताच्या बांधकाम पध्दतीनुसार काँक्रीटची पहिली पाटी टाकून/शिला/ काॅलम/विट याची आग्नेय दिशेत स्थापना करुन ,प्रदक्षिणा मार्गाने बांधकामास आरंभ करावा.
गर्ग मतानुसार ईशान्य कोपऱ्यात देखील गृहारंभ करु शकता.
झोपडी किंवा जुने घर बांधत असताना मात्र याची आवश्यकता नसते हे खालील श्लोकावरून लक्षात येते.
आयव्ययाैभूशुद्धिं च तृणगेहे न कारयेत।
शिलान्यासादि नो कुर्यात्तथागारे पुरातने ॥४७॥
(वास्तू रत्नावली)
जर गवताचे घर, झोपडी बनवायचे असेल तर भू शुद्धी व आय व्यय शोधन करु नये. तेथे शिलान्यासाची ही गरज नसते.जुन्या घराचे काम करवून घेताना शिलान्यास आवश्यक मानत नाहीत.
क्रमश:
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…मागील भाग
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
वास्तु म्हणजे काय ?
वास्तु शास्त्र । बांधकामांसाठी जमीन ताब्यात घेण्यापूर्वी कोणता विधी करावा ?













































































