Last Updated on 24 Jan 2024 5:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत वाळवा तालुक्यातील महसूल अभिलेख्यात तपासणी केलेल्या अभिलेखात 17 हजार 284 कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.वाळवा तालुक्यातील सर्वच गावच्या चावडीमध्ये तसेच ग्रामपंचायत कार्यालयात येत्या एक-दोन दिवसात नोंदी यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली,त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले होते.
हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू…वाळवा तालुक्यातील ४८ हजार ४० कुटूंबांचे होणार सर्वेक्षण
तालुक्यातील महसूल अभिलेख्यात तपासणी केल्यानंतर अभिलेखात 17 हजार 284 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.मराठी व मोडी मध्ये नोंदी आढळून आलेल्या असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.काही थोड्या गावांचे मोडी लिपीतील नोंदींच्या भाषांतराचे काम अपूर्ण आहे.तेही लवकरच पर्ण होईल.वाळवा तालुक्यातील सर्वच गावच्या चावडीमध्ये तसेच ग्रामपंचायत कार्यालयात त्या-त्या गावची नोंदी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार उबाळे यांनी दिली.
हेही वाचा – इस्लामपूर मतदारसंघात महिला, नव मतदारांचा टक्का वाढला











































































