Last Updated on 25 May 2023 3:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
पुणे । राज्यातील 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर निकाल जाहीर होणार आहे.
उद्या दुपारी दोन वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे.राज्यातील नऊ विभागीय मंडळांच्या मार्फत घेण्यात आली होती.पुणे,मुंबई,नागपूर,औरंगाबाद,लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत राज्यभरातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा पार पडली.यंदा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान 12 वीची परीक्षा पार पडली.हा निकाल कधी लागणार या बाबत विद्यार्थी आणि पालक वर्ग प्रतिक्षेत होता.मात्र, मे महिन्याच्या अगदी अखेरीऐवजी राज्य बोर्डाने 25 मे रोजी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करून सुखद धक्का दिला आहे.
गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतिक्षा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे.उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.
या संकेतस्थळावर पाहू शकतात निकाल
विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. परीक्षांचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळाला भेट देणं अपेक्षित असेल. त्यासोबतच http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org आणि http://mahresults.org.in या लिंकवर जाऊनही निकाल पाहू शकतात.
असा चेक करा निकाल
mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमची आवश्यक क्रेडेन्शियल्स एंटर करा.
“निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वीचा निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल.
भविष्यातील वापरासाठी Save करा.
![]()
हेही वाचा…
ग्रहणाशी डोळे भिडवणाऱ्या सावित्रीच्या लेकीला सदृढ कन्यारत्न; नुकतेच झाले ‘राजनंदिनी’ असे नामकरण
![]()












































































