Last Updated on 17 May 2023 7:01 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । अंधश्रद्धेला छेद देऊन ग्रहणाशी डोळे भीडवणाऱ्या सावित्रीच्या लेकीने गोंडस अश्या सदृढ कन्यारत्नाला जन्म दिला.नुकतेच मुलीचे राजनंदिनी असे नामकरण करण्यात आले आहे.
अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी नवेखेड येथील सावित्रीच्या लेकीने परंपरेशी विद्रोह करून सूर्यग्रहणाशी डोळे भिडवुन अंधश्रद्धेला छेद दिला होता.
नवेखेड (ता.वाळवा) येथील पूजा ऋषीराज जाधव व ऋषिराज मोहन जाधव या उच्चशिक्षित जोडप्याने पुढाकार घेऊन समाजातील ग्रहण न पाहण्याच्या अनिष्ठ प्रथेला मूठमाती दिली होती आणि समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.
ग्रहणकाळात पूजा जाधव यांनी सोलर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळे भिडवले होते.विशेष म्हणजे घरातील सर्व कुटूंबाचे सहकार्य त्यांना लाभले.पूजा जाधव यांच्या आज्जेसासू शांताबाई जाधव,सासू माजी सरपंच छाया जाधव,सासरे मराठा शिक्षण संस्थेचे संस्थापक मोहन जाधव दिर पंकज जाधव,जाऊ प्रियांका जाधव यांची मोलाची साथ लाभली.
ग्रहण काळात जे करायचे नाही ते करून दाखवत,पूजा यांनी आदर्श निर्माण केला.हा उपक्रम राबवण्यासाठी शंभूराजे प्रतिष्ठान नवेखेड,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नितीन शिंदे,प्रा शंकर चव्हाण,बाजीराव ताटे,अंकुश चव्हाण यांचे सहकार्य लाभले होते.नुकतेच पै पाहुण्यांच्या उपस्थितीत पूजा आणि ऋषिराज या उभयंतांनी आणि पै पाहुण्यांनी जन्मलेल्या कन्यारत्नाचे दिमाखदार सोहळ्यात राजनंदिनी असे नामकरण केले.राजनंदिनी तीन महिन्यांची झाली आहे.या दिमाखदार सोहळ्यासाठी पै पाहुणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा…












































































