Last Updated on 28 Dec 2023 8:42 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ आधारभूत उतारा निश्चित केला आहे,त्यासाठी ३१५० रुपये
छत्रपती संभाजीनगर,अमरावती व नागपूर विभागासाठी ९.५० टक्के साखर उतारा निश्चित,त्यासाठी २९९१ रुपये एफआरपी
मुंबई । राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा अंतिम दर देण्यासाठी उसाच्या गाळप हंगामातील अंतिम उतारा निश्चित करण्यात आला असून, यामध्ये पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ आधारभूत उतारा निश्चित केला आहे,त्यासाठी ३१५० रुपये तर छत्रपती संभाजीनगर,अमरावती व नागपूर विभागासाठी ९.५० टक्के साखर उतारा निश्चित केला असून,त्यासाठी २९९१ रुपये एफआरपी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने दिनांक ०६ जुलै २०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे,गाळप हंगाम २०२३-२४ साठीचा किमान एफआरपी ऊसदर प्रसिध्द केलेला आहे.सदर अधिसूचनेद्वारे जाहिर केलेला ऊस दर विचारात घेता,गाळप हंगाम २०२२-२३ साठी जाहिर केलेल्या एफआरपी ऊसदरात बदल झालेला आहे.सदर बदल आणि त्यासंदर्भातील दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश विचारात घेता,२०२३-२४ हंगामाया अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यत, हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफआरपी ऊसदर निश्चित करताना आधारभूत धरावयाचा किमान साखर उतारा निश्चित करणे आवश्यक असल्याने शासनाने त्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.
गाळप हंगाम २०२३-२४ व त्यापुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत, हंगाम सुरू झाल्यापासुन गाळप केलेल्या ऊसासाठी सुरूवातीचा किमान एफआरपी ऊसदर अदा करताना आधारभूत धरावयाचा साखर उतारा महसूल विभागनिहाय पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.
पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ आधारभूत उतारा निश्चित केला आहे, त्यासाठी ३१५० रुपये तर छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभागासाठी ९.५० टक्के साखर उतारा निश्चित केला असून, त्यासाठी २९९१ रुपये एफआरपी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
वरीलप्रमाणे आधारभूत साखर उतारा विचारात घेऊन त्या त्या महसुल विभागातील साखर कारखान्यांनी केंद्र शासनाने सन २०२३-२४ च्या हंगामासाठी एफ. आर. पी च्या धोरणात दि.०६/०७/२०२३ च्या अधिसूचनेद्वारे निश्चित केलेल्या मुलभूत एफ.आर.पी. दरानुसार हंगामाच्या सुरुवातीचा किमान एफ.आर.पी. ऊसदर खालीलप्रमाणे निश्चित करून ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील कलम ३ नुसार अदा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
१. हंगाम २०२३-२४ करीता बेसिक १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी रास्त व किफायतशीर ऊसदर प्रति क्विंटल ३१५ रुपये
२. साखर उतारा १०.२५ टक्केच्या वरील प्रत्येक ०.५ टक्के उत्तारा वाढीसाठी प्रिमियम दर ३.०७ रुपये प्रति क्विंटल
३. साखर उतारा १०.२५ टक्केपेक्षा कमी परंतु ९.५० टक्के पेक्षा जास्त असलेल्या प्रकरणी, प्रत्येक ०.१ टक्के उतारा घटीसाठी ३.०७ रुपये प्रति क्विंटल तथापि, साखर उतारा ९.५० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास रास्त व किफायतशीर ऊसदर २९१.९७५ रुपये प्रति क्विंटल.
आधारभूत घरावयाचा किमान साखर उत्तारा यासह इतर सर्व घोरणात्मक बाबी या दि. २१ फेब्रुवारी२०२२ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे राहतील.

सांगली जिल्ह्यात ऊस दराचा तोडगा…पहिली उचल एकरकमी 3175 रूपये
सावधान! प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेचे फसवे संकेतस्थळ आणि एसएमएस…
Potato Bites । अगदी कमी साहित्यात बनवा क्रिस्पी पोटॅटो बाईट्स…
आरोग्य । सकाळच्या शिळ्या लाळेचे आहेत खूप फायदे
देशात अंडी आणि ब्रॉयलरचे उत्पादनात वर्षाला 8 ते 10 टक्के दराने वाढ












































































