Last Updated on 05 Nov 2023 6:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सहकारी साखर कारखानदारीसमोरच्या आव्हानांना सामोरे जाताना सर्वानीच मदतीचा हात द्यायला हवा
सांगली । सहकारी साखर कारखानदारीने राज्याच्या ग्रामीण भागाच्या आर्थिक,सामाजिक,शैक्षणिक प्रगतीत मोलाचे योगदान केलेले आहे.सध्या सहकारी साखर कारखानदारीसमोर अनेक आव्हाने उभी आहेत.या आव्हानांना सामोरे जाताना ऊस उत्पादक शेतकरी व संबंधित सर्व घटकांनी मदतीचा हात द्यायला हवा,अशी भावना राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी व्यक्त केली.
प्रतिक पाटील यांनी बावची,पोखर्णी,ढवळी,नागांव,भडकंबे,कोरेगाव व शिगाव या गावांचा संपर्क दौरा करून ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या अडी- अडचणी समजून घेतल्या.त्यांच्या समवेत कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील,संचालक बबनराव थोटे,वैभव रकटे,संचालिका मेघा पाटील,मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,ऊस विकास अधिकारी सुजय पाटील,गटाधिकारी प्रणिल पाटील,श्रीधर चव्हाण प्रामुख्याने होते.यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

प्रतिकदादा पाटील म्हणाले,यावर्षी आम्ही काटेकोर नियोजन करून गांवनिहाय्य ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेचे नियोजन केलेले आहे. पूर्वी शेती कर्मचाऱ्यास मोबाईल अँप वर १०० शेतकऱ्यांची नावे दिली जात होती. मात्र यावर्षी आम्ही मोठ्या गावास ५०,तर लहान गावात २५ नांवे देणार आहोत. त्यामुळे कोणासही नांवे खाली-वर करता येणार नाही. जर एखाद्या शेतकऱ्यांची रस्त्यासारखी अडचण असेल,तर तिथे गटाधिकारी,मुख्य शेती अधिकारी स्वतः लक्ष घालतील.आपल्या साखर कारखान्याने नेहमीच राज्यात अग्रेसर असा ऊस दर दिला आहे.(‘अधोरेखित’चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हेही वाचा – राजारामबापू कारखाना ठेवीचे 75 रुपये दिवाळीपूर्वी देणार: प्रतिक पाटील
राजारामबापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विजयराव यादव,संचालक सुरेश पाटील,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष बी.के.पाटील,माजी संचालक बाळासाहेब कोकाटे,चोखा गोंधळी,लालासाहेब पाटील,कोरेगावचे माजी सरपंच व्यंकटराव पाटील,ढवळीचे शरद पाटील,शिगावचे माजी सरपंच उदय पाटील,प्रताप मधाळे,मधुकर पाटील,अजित बारवडे,भडकंबेचे सरपंच सुधीर पाटील,प्रकाश पाटील,भानुदास पाटील,पोखर्णीचे नंदकुमार पाटील,नागावचे तात्यासो पाटील, आप्पासो पाटील,एम.बी.पाटील यांच्यासह सर्व गावातील प्रमुख पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या संपर्क दौऱ्यात सहभागी झाले होते.
ऊस तोडणीमध्ये फारशा तक्रारी राहणार नाहीत…तरीही काही अडचणी आल्या,तर थेट संपर्क करा : प्रतिक पाटील
थंडीमध्ये पायात गोळे येत असतील तर ‘हे’ घरगुती उपाय जरूर करा
इस्लामपूर : एस. टी. प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय ‘सेल्फी पॉइंट’
पाटगावचा ‘हनी ब्रँड’ पोहोचणार जगभरात
सणासुदीला मिठाई,अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई










































































