Last Updated on 28 Oct 2023 2:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अधोरेखित ऑनलाइन डेस्क । इस्लामपूर एस. टी. बसस्थानकात तयार करण्यात आलेला ‘सेल्फी पॉइंट’ प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.या ‘सेल्फी पॉइंट’ समोर उभे राहून अनेक प्रवासी सेल्फी काढत एस. टी. शी वर्षानुवर्षे असलेलं नातं अधिक वृद्धिंगत करताना दिसत आहेत.
इस्लामपूर येथील एस. टी. बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या समोरच हा ‘सेल्फी पॉइंट’ तयार करण्यात आला आहे.प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच प्रवाशांचे अगदी सहज लक्ष या ‘सेल्फी पॉइंट’ कडे जाते.इस्लामपूरचे आगारप्रमुख दिलीप ठोंबरे यांच्या संकल्पनेतून आणि वाहतूक निरीक्षक अभिजित लाड, सहाय्यक वाहतूक निरीक्षक मिलिंद कुंभार व दीपक यादव तसेच लिपिक चेतन जाधव,सागर वीरकर आदींच्या विशेष प्रयत्नातून हा ‘सेल्फी पॉइंट’ तयार झाला आहे.
कराड येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या इस्लामपूर शाखेचे या संकल्पनेला सहकार्य लाभले आहे.त्याचबरोबर एस. टी. च्या सर्वच कर्मचाऱ्यांचा यासाठी हातभार लागला आहे.
हा ‘सेल्फी पॉइंट’ आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आला आहे.त्यावर I LOVE आणि त्यासमोर एस. टी. चे चित्र लावण्यात आले आहे.तसेच समोर रोपांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.हा ‘सेल्फी पॉइंट’ प्रवाशांना आकर्षित करत आहे.या ‘सेल्फी पॉइंट’ वर प्रवासी सेल्फी घेत एस. टी. शी वर्षानुवर्षे असलेलं नातं अधिक वृद्धिंगत करताना दिसत आहेत.एकप्रकारे हा ‘सेल्फी पॉइंट’ हे प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.











































































