Last Updated on 14 Dec 2021 7:23 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग परीसर पर्यटनासाठी प्रसिध्द आहे कोट्यावधी रुपये खर्च करुन येथे पर्यटकांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.परंतु हा सर्व परीसर कृष्णा नदीपात्रात येत असल्याने पूर परिस्थिती कालखंडात संपूर्ण परिसर पाण्याने व्यापलेला असतो.त्यामुळे येथील सर्वत्र गाळ साचतो याची दखल घेऊन बहे गावातील सुशिक्षित व उच्चशिक्षित तरुणांनी रविवारी ‘स्वच्छ रामलिंग बेट’ या अभियानाचा प्रारंभ केला.

भल्या पहाटे या अभियानाची सुरवात झाली व बघता बघता बेटाचा परिसर स्वछ सुंदर दिसु लागला.परिसर स्वछतेनंतर श्रमपरिहार करून व पुन्हा पुढच्या रविवारी परत येण्याचा निर्धार करून अभियानाची सांगता झाली.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
स्वच्छता मानवी जीवनाचा अतिशय अविभाज्य घटक.पण आपली वैयक्तिक स्वच्छता जपताना आपण सार्वजनिक स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष करतो आणि आपल्या आजूबाजूचा परिसर आपण अस्वच्छ करून टाकतो.अशीच काहीशी पुरामुळे,फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे रामलिंग बेटावरती झालेली अस्वच्छता पाहून बहे गावातील सुशिक्षित व उच्चशिक्षित तरुणांनी ‘स्वच्छ रामलिंग बेट’ या अभियान राबविले.पुन्हा पुढच्या रविवारी हे अभियान पुढे चालू राहणार आहे.
यावेळी अमोल नावडकर,हेमंत पाटील,सुनील पाटील,अभिजीत उदाळे,सागर लोहार,अभिजीत तोरस्कर,अभिजीत पाटील,रोहित तोरस्कर,हर्षल पाटील,ऋषिकेश पाटील,शिवतेज पाटील,संकेत बावचकर,विनायक बावचकर,श्रेयश गोरे,हर्षवर्धन हादवे, अवधूत जंगम,वेदांत पाटील,श्रेयश पाटील आदींनी श्रमदान केले.

हेही वाचा..
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल









































































