Last Updated on 09 Dec 2021 5:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महिला बचतगट व त्या बचत गटाचे उदात्तीकरण करण्याच्या दृष्टीने गटांचा मिळून एक ग्रामसंघ स्थापन
सांगली ।

महिला सबलीकरणाच्या दृष्टीने आवश्यक असणारे महिला बचतगट व त्या बचत गटाचे उदात्तीकरण करण्याच्या दृष्टीने बहे गावामध्ये पंचायत समितीच्या वतीने सर्व गटांचा मिळून एक ग्रामसंघ तयार करण्यात आला.
या सर्व बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी वर्धा जिह्यातील कार्यकर्त्या(वर्धिनी) यांनी 5 दिवस शिबीर घेऊन महिलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या निरोपाचा कार्यक्रमानिमित्त सर्व वर्धिनीचा सत्कार वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सौ सुनीता देशमाने व जिल्हा प्रतिनिधी मेघा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी सरपंच सौ.छायाताई पाटील,वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी उपाध्यक्ष वैशाली पाटील,राजाराम बापु कारखाण्याच्या संचालिका सुवर्णा पाटील,बहे गावच्या नुतन उपसरपंच अर्चना दमामे,ग्रामपंचायत सदस्य रुपाली देशमुख,पंचायत समितीच्या प्रभाग स्वयंसेवक मनिषा ठाणेकर,पद्मजा भाकरे,सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजीराव पाटील व ग्रामपंचायत सदस्य रोहित तोरस्कर आदी उपस्थित होते.स्वाती गुरव यांनी आभार मानले.
ग्रामसंघाची कार्यकारिणी अशी :
अध्यक्ष वैशाली पाटील,सचिव- रूपाली भंडारे,कोषाध्यक्ष – मनिषा नावडकर पाटील आणि लिपिका – वैभवी पाटील,C R. P- मनिषा कदम यांची निवड करण्यात आली.
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇











































































