Last Updated on 17 May 2023 10:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । खतांच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे यंदाच्या खरीप हंगामात खतांसाठी एक लाख ८ हजार कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाला.केंद्रीय रसायने आणि खत मंत्री मनसुख मांडविय यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.
मंत्रीमंडळाने २०२२-२३च्या रब्बी हंगामासाठी,तसेच २०२३च्या खरीप हंगामासाठी, पिकांसाठी आवश्यक विविध पोषण घटकांनुसार,पोषक तत्वावर आधारित अनुदानाच्या दरांमध्ये सुधारणा करण्यासाठीच्या प्रस्तावालाही मान्यता दिल्याचे ते म्हणाले.याअंतर्गत २०२३च्या खरीप हंगामात सरकारकडून फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांसाठी ३८ हजार कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.












































































