Last Updated on 17 Jul 2024 9:17 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पंढरपूर । राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपुर्वी ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली आहे.या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होणार आहेत.त्यानंतर आता राज्य सरकारने राज्यातील भावांसाठीही नवी योजना आणली आहे.
लाडकी बहीण योजनेनंतर आता आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे.तीन वेगवेगळ्या गटांमध्ये निधीची वर्गवारी करण्यात आली आहे.
हेही वाचा – लाडक्या बहिणीला रक्षाबंधनपूर्वी मिळणार लाभ
‘लाडका भाऊ’ योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला दहा हजार रुपये दिले जाणार आहेत. हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील. तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल. अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील. या योजनेच्या माध्यमातून कुशल कामगार तयार करत असल्याचे सांगून शिंदे म्हणाले, की राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. त्याचे पैसे सरकार भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून, त्यातून बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
ही योजना फक्त महाराष्ट्रात राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा. तो 12 वी उत्तीर्ण हवा. युवकांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणं हा या योजनेमागचा उद्देश आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्या अर्जाची छाननी होईल आणि त्यानंतर लाभार्थी युवकांना खात्यावर पैसे येतील.
हेही वाचा – अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती : काय करावे आणि काय करु नये…
‘लाडका भाऊ’ साठी पात्रता
लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024 चा लाभ घेण्यासाठी, राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक
या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील.
अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी.
या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील.
अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.











































































