Last Updated on 25 Sep 2023 10:05 AM by Sanjay Patil/Adhorekhit
तीन दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागात ‘यलो अलर्ट’
मुंबई । गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात चांगला पाऊस पडत आहे.कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.पावसाची ही मालिका आणखी काही दिवस सुरू राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तर राज्याच्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) मते,महाराष्ट्रात मान्सूनचा वेग वाढला आहे.राज्यात गुरुवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.या काळात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल.सध्या सिक्कीम ते मध्य महाराष्ट्रापर्यंत तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
त्याचवेळी, IMD ने वादळासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.27 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद,बीड आणि सोलापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ,विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून,यलो अलर्ट जारी केला आहे.सांगलीत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.तर 28 सप्टेंबर रोजी सातारा,कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 आणि 28 तारखेला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.जळगाव,नाशिक जिल्ह्यात 25 आणि 26 तर अहमदनगरआणि पुणे जिल्ह्यात 25 ते 28 दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 28 तारखेला तर सातारा,सांगली,सोलापूर,औरंगाबाद जिल्ह्यांना 26 ते 28 दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.त्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टी होत आहे. 27 ते 28 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.










































































