Last Updated on 30 Oct 2023 7:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मनोज जरांगेंची घेणार भेट
सांगली । ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन 400 हप्तासाठी व राज्यातील साखर कारखान्याचे वजन काटे आँनलाईन व डिजिटल करावेत.या प्रमुख मागणीसाठी पदयात्रा आज (सोमवारी) 14 व्या दिवशी माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.इस्लामपूर येथे झालेल्या पत्रकार बैठकीत शेट्टी यांनी ही माहिती दिली.
राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरंगे पाटील यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला.ही या पदयात्रा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकार बैठकीत त्यांनी सांगितले.करमाळे या ठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देत स्थगित करण्याचा निर्णय घेतला.गतवर्षीचे 400 रुपये मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरु होवू देणार नाही. साखर कारखान्यास जाणारा ऊस गनिमी काव्याने रोखू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे.त्यांच्या उपोषणाचा आज 6 वा दिवस आहे.जरांगे पाटील यांची तब्बेत खूपच खालावली आहे.एक कार्यकर्ता मराठा आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करीत आहे.असे असताना आपण हार,गुच्छ व फुलांचे हार गळ्यात घेणे मनाला पटले नाही म्हणून,आजपासून पदयात्रेला स्थगिती देवून मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी बी.जी.पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरु
माजी खा. राजू शेट्टी म्हणाले,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता.त्यानंतर आमरण उपोषण सुरु करुन 6 दिवस झाले.अजूनही राज्य सरकार ठोस निर्णय घ्यायला तयार नसल्याने राज्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.सरकारचे धोरण शेतीला मारक आहे.आर्थिक दुरावस्था झाल्यानेच शेतकरी आत्महत्या करित आहेत.85 टक्के मराठा समाज शेती व्यवसायाशी निगडीत आहे. सरकारने तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यावे.यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा.राज्याने जबाबदारी न झटकता केंद्राला कागदोपत्री पुर्तता करावी.गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये प्रतिटन मिळावेत.कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करावे या मागणीसाठी 17 ऑक्टोबर पासून जनआक्रोश यात्रा सुरु केली होती.स्वाभिमानीच्या जनआक्रोस पदयात्रेस सर्वस्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून फुलांची उधळण करत स्वागत आहे. परंतू आमचे सहकारी मनोज पाटील उपोषणाला बसले आहेत. अशा परिस्थितीत स्वागत स्विकारणे माझ्या सद्सदविवेक बुद्धीला पटणारे नाही.त्यामुळे शिराळा तालुक्यातील करमाळे येथे पदयात्रा स्थगित केली आहे.मराठा समाजाच्या आंदोलनाशी दिशा पाहून जेथून यात्रा स्थगित केली तेथूनच यात्रेला सुरुवात केली जाईल.
हेही वाचा – नेत्यांना गावबंदी,आंदोलक आक्रमक…आंदोलनाचा भडका
महेश खराडे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. डिसेंबर 2011 साली लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी माजी खा.राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम केली होती.स्वाभिमानीतर्फे सांगली जिल्ह्यातून 12 ऑक्टोबर पासून सुरु झालेली यात्राही स्थगित केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे,भागवत जाधव,अॅड.एस.यु.संदे,संदीप राजोबा,पोपट मोरे,प्रकाश देसाई,संजय बेले,कॉ. दिग्विजय पाटील,उमेश कुरळपकर,विजय महाडीक यांच्यासह शेतकरी संघटना व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.












































































