Last Updated on 29 Sep 2022 2:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
नवी दिल्ली | देशातील वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असतांना पुन्हा एकदा महागाईची झळ सोसावी लागणार आहे.सर्वसामान्य ग्राहकांना आता घरगुती गॅस सिलेंडरच्या रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे.
आता नवीन नियमांनुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा जास्त सिलिंडर दिले जाणार नाहीत. त्याचबरोबर एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला आहे. कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही.आत्तापर्यंत घरगुती विना-अनुदान कनेक्शनधारक हवे तितके सिलिंडर घेऊ शकत होते.
याशिवाय अनुदानित घरगुती गॅसचे रीफिल हे व्यावसायिक गॅस सिलिंडरपेक्षा महाग असल्यामुळे व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस रिफीलचा वापर कऱण्यात आल्याने त्याच्या तक्रारी समोर येत असून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, हा नवीन नियम तिनही तेल कंपन्यांकडून लागू करण्यात आला असून त्यानुसार आता अनुदानित सिलेंडरची नोंदणी असणाऱ्या ग्राहकांना वर्षभरात फक्त १२ गॅस सिलेंडर मिळतील. तर यापेक्षा जास्त सिलेंडरची आवश्यकता असल्यास ग्राहकांना विनाअनुदानित सिलेंडर घ्यावे लागणार आहे. तसेच रेशनिंग अंतर्गत एक ग्राहक महिन्यात फक्त दोन घरगुती गॅस सिलिंडर घेऊ शकणार आहे.
तक्रारींच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतला
वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले असून तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून विभागाला अशा तक्रारी येत होत्या की, घरगुती विनाअनुदानित रिफिल व्यावसायिकांपेक्षा स्वस्त असल्याने तेथे वापरल्या जात आहेत.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
वास्तु म्हणजे काय ?
![]()












































































