Last Updated on 24 Jul 2024 10:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सातारा । जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडत असून कोयना आणि कृष्णा नदीतील पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे.कोयना धरणाचा पाणीसाठा 70 टीएमसीच्या वर पोहोचला आहे.कोयना धरणातील पाणीसाठा 70.96 टीएमसी इतका झाला असून धरण 67.42 टक्के भरले आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.विशेषतः करुन पश्चिमेकडे धो-धो पाऊस कोसळत आहे.यामध्ये कास, बामणोली, ठोसेघर, कोयना, नवजा भागासह महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे माळराने आणि ओढेही भरभरून वाहत आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.परिणामी धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठ्यातही लक्षणीय वाढ वाढ झाली असून बुधवारी सकाळी सुमारे 55 हजार 522 क्यूसेक वेगाने पाणी येत होते.पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या एक युनीट सुरू असून त्यातून 1 हजार 50 क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
बुधवारी सायंकाळी पाच पर्यंत कोयना धरणामध्ये साधारण 67 मिलिमीटर, नवजा येथे 106 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 91 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 70.96 टीएमसी इतका झाला असून धरण 67.42 टक्के भरले आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 961 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 491 आणि महाबळेश्वरमध्ये 2 हजार 892 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
…तर पूरस्थिती उद्भवू शकते
पाऊस पुढचे चार दिवस असाच सुरू राहिल्यास कोयना पाणलोट क्षेत्रातुन दर दोन दिवसाला दहा टीएमसी पाणी येणार आहे.त्यामुळे चारच दिवसात धरण 90 टीएमसी होईल.नाईलाजाणे कोयना सांडव्यातून पाणी सोडावे लागेल.पुढे अलमट्टी धरणाला पाणी सोडण्यास मर्यादा असल्याच्या पाहून कृष्णा नदी येत्या काही दिवसात आयर्विन पूल 40 ते 42 फूट जाईल.त्यामुळे पूरस्थिती उद्भवू शकते हा अंदाज आहे.नैसर्गिक परिस्थिती बदलल्यास बदल होऊ शकतो.
अंकुश चव्हाण,अभ्यासक
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा
वीजप्रवाह : पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय रस्त्यांवर गाडी चालवणे हा दंडनीय गुन्हा…
कोयना धरण
दि.24/07/2024, वेळ:सायंकाळी 05:00 वाजता
पाणीपातळी:2131’00”(649.529मी)
पाणीसाठा: 70.96 टीएमसी(67.42%)
आवक:- 55,522 क्यूसेक्स
पायथा ग्रहातून 1050 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 67/2894
नवजा 106/3385
महाबळेश्वर 91/2801
पूर नियंत्रण कक्ष,सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–24/07/2024 5.00 PM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/18’05”
2) बहे पूल-(23.7)10’03”
3) ताकारी पूल (46)/31’09”
4)भिलवडी पूल -(53)32’02”
5)आयर्विन- (45)/30’03”
6)राजापूर बंधारा-(58)/44’01”
7) राजाराम बंधारा-(43)/42’05”
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 36028
2) आयर्विन पूल – 58559
3) राजापूर बंधारा – 142208
4) राजाराम बंधारा – 62143
5) कोयनाधरण- 70.97 TMC/1050
6)वारणा धरण- 29.61 TMC/ 8874
7)अलमट्टी धरण- 91.263
आवक – 172807
जावक- 200000











































































