Last Updated on 30 Oct 2026 9:13 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर : शिवाजी विद्यापीठ कक्षेतील बी.कॉम. भाग ३ च्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या व्यवसाय अभ्यास (बिझनेस स्टडीज) या विषयांतर्गत ५ पुस्तकांचे प्रकाशन शिवाजी विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम.जाधव, मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंकुश बेलवटकर हे उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 30 Oct 2026 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit बाह्यरुग्ण तपासणीसह घरभेटी, टेलिमेडिसिन आणि १४ प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्यांवर भर मुंबई | राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घराजवळच दर्जेदार, सर्वसमावेशक आणि सातत्यपूर्ण प्... Read more
- शिवाजी विद्यापीठात बी.कॉम.च्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
- शिक्षक-पदवीधर निवडणुकीत कसा ठरणार विजयी उमेदवार? जाणून घ्या मतमोजणीची रंजक प्रक्रिया
- युवापिढीने जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवावी : आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
- शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी पाच हजार रुपये जमा करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांव्यतिरिक्त अन्य १९ तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे निर्देश
- कर्जमुक्तीच्या तिसऱ्या टप्प्यात ३ लाख २७ हजार २५० शेतकऱ्यांना ३ हजार १६० कोटी ४३ लाख रुपयांचा लाभ
या पुस्तकांचे लेखन शिवाजी विद्यापीठ वाणिज्य अभ्यास मंडळ सदस्य प्राचार्य डॉ. उदय शिंदे, शिवाजी विद्यापीठ अभ्यास मंडळ आणि कॉमर्स शाखेचे फॅकल्टी मेंबर प्रा.डॉ.अशोक शिंदे आणि प्रा.ॲड.डॉ.विवेक बोंगाळे यांनी केले आहे. कुलगुरू डॉ.कामत यांच्या हस्ते झालेल्या प्रकाशन प्रसंगी लेखक डॉ.अशोक शिंदे, प्रा.डॉ. विवेक बोंगाळे उपस्थित होते. या तीन लेखकांनी बी.कॉम.भाग ३ या वर्षासाठी कृषिव्यवसाय व्यवस्थापन, व्यवसायविषयक कायदे, आंतरराष्ट्रीय व्यवसाय, व्यवसायासाठी निर्णय प्रक्रिया आणिव्यवसाय नीतिशास्त्र; ही पुस्तके लिहिली आहेत.











































































