Last Updated on 05 Jul 2026 2:02 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ईश्वरपूर |
उरुण ईश्वरपूर (डीसीसी कॉलनी,हनुमाननगर) येथील सौ. शालिनी बाळासाहेब लोखंडे (वय ७२ वर्षे) यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन व कार्य विधी मंगळवार दि.७ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता येथील कापुसखेड नाका स्मशान भूमीत होणार आहे. राजारामबापू साखर कारखान्याचे माजी कामगार प्रतिनिधी, साखर कामगार नेते बाळासाहेब लोखंडे यांच्या त्या पत्नी, तर महावितरण (बारामती) चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता ऋषिकेश लोखंडे यांच्या मातोश्री होत.











































































