Last Updated on 17 Jul 2023 10:46 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | भारतीय हवामान विभागाने मुंबईसह ठाणे,पालघर, रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,पुणे,जळगाव, कोल्हापूर,सातारा,जालना,औरंगाबाद या जिल्ह्यांतील काही ठिकाणी मंगळवार 18 जुलै 2023 रोजी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
तसेच 21 जुलै 2023 पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.
हेही वाचा – शुभसंयोग : श्रावण…अधिक श्रावण मास; जाणून घ्या धार्मिक महत्त्व
या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 45, तर काही ठिकाणी तो ताशी 55 किलोमीटरपर्यंत जावू शकतो, अशीही शक्यता वर्तविली आहे.या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून मासेमारांनी समुद्रात जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
पावसाचा इशारा दिल्यानंतर राज्य शासनाने संबंधित जिल्हा प्रशासनांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
००००












































































