मुंबई |
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली धरणापासून २६ किलोमीटरच्या वारणा डाव्या कालव्याच्या आणि पोट कालव्याची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, असे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य डॉ. विनय कोरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले की, वारणा डाव्या कालव्याचे १० किलोमीटरचे जिओ सिंथेटिक लाईनिंग काम पूर्ण झाले असून वरच्या अडीच किलोमीटरसाठी अंदाजपत्रक तयार केले आहे. त्याला मान्यता मिळाली की संपूर्णपणे गळती थांबण्यास मदत होणार आहे. खोदकाम कालवा १३.५ किलोमीटर लांबीचा आहे, तसेच काही ठिकाणचे यूसीआर लाईनिंग खराब झालेले आहे, त्यातून देखील गळती होत असून यातील काही कामांच्या निविदा अंतिम झाल्या असून जून २०२२ पर्यंत ते पूर्ण करता येईल, असेही जलसंपदामंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.



































































