राज्यात हळुहळु गुलाबी थंडीला सुरूवात झाली आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे असंख्य नागरिकांना थंडीच्या मोसमात सर्दी-खोकला,ताप सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. हे आजार लहानमुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वानाच होतात.त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करणे गरजेच आहे.तसेच अशा आजारांना त्वरित उपचार करणे गरजेचे आहे.
तर पाहुयात शरीराला विपरीत परिणाम होणार नाही असे काही उपाय…
- अँटिऑक्सिडंट आणि प्रतिजैविक गुणधर्म मनुक्यात असल्यामुळे ताप कमी होतो. आपण अर्धा कप पाण्यात साधारण 25 मनुका एक तासांसाठी भिजत घालून ठेवा. मनुका मऊ झाल्या की थोड्या क्रश करून त्यातील पाणी काढून टाका. अर्ध्या लिंबाचा रस त्यात घाला, आणि हे मिश्रण दिवसातून दोन वेळा द्या. असे केल्याने ताप कमी होण्यास मदत होईल.
- शरीराची रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत करण्यास मदत करते. हे लघवीचे प्रमाण वाढवते ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. विषाणूजन्य ताप प्रभावीपणे कमी करण्यासाठी आपण तांदळाच्या पेजेचा वापर करू शकता.
- जर आपण भारतीय असाल तर आपल्या आई किंवा आजीने कांद्याच्या औषधी गुणांविषयी आपल्याला सांगितलेच असेल. कांदा शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करतो तसेच त्यामुळे वेदनाही कमी होतात. यासाठी फक्त अख्ख्या कांद्याचे बारीक तुकडे करावेत आणि काही मिनिटे ताप आलेल्या माणसांच्या पायांवर 2 ते 3 तुकडे घालावेत. ताप कमी करण्यासाठी ही प्रक्रिया दिवसातून दोनदा केली जाऊ शकते.
- लिंबातील व्हिटॅमिन सी आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती मजबूत करते. मध आपल्या शरीराला पोषण देते. ताप कमी करण्यात दोघांचे मिश्रण प्रभावी आहे. आपण लिंबू रस 1 टेबल स्पून आणि मध 1 टेबल स्पून असे मिश्रण करा. चांगले मिक्स करा आणि आपल्या बाळाला द्या. त्याचा ताप निश्चितपणे कमी होईल.
कसा असावा आहार ?
हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.कारण या ऋतूमध्ये कित्येक प्रकारच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारामध्ये अख्खे कडधान्य,दलिया इत्यादी पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.हे पदार्थ आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी पोषक असतात.तसेच हिवाळ्यामध्ये अधिक प्रमाणात भाज्या आणि फळांचे सेवन करावे.फळ आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो.या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा झाल्यास आजारांविरोधात लढण्यात मदत मिळते.थंडीमध्ये शक्यतो तेलकट – तिखट खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळावे.थंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी खावी. लहान मुलांना बाजरीची भाकरी खाऊ घालावी. बाजरीमध्ये सर्वात जास्त प्रोटीनचे प्रमाण असते. बाजरीमध्ये शरीरासाठी आवश्यक तत्त्व,मॅग्नेशियम,कॅल्शियम, मॅग्नीज,ट्रिप्टोफेन, फायबर,व्हिटॅमिन- बी, अँटीआक्सीडेंटचे प्रमाण भरपूर असते.
थंडीपासून करावे संरक्षण
हिवाळ्यामध्ये आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे परिधान करावेत.या दिवसांत विशेषतः पाय-मोजे, हात-मोजे,कानटोपी इत्यादी गोष्टींचा वापर करावा.तसेच पुरेशा प्रमाणात झोप देखील घ्यावी.उबदार पोषाखांव्यतिरिक्त आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा.ज्या पदार्थांच्या सेवनाने शरीरात उष्णता निर्माण होईल,असा डाएट फॉलो करावा.दरम्यान,हिवाळ्यात त्वचेशी संबंधित विकार मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.या समस्या टाळण्यासाठी तेल किंवा बॉडी लोशनचा उपयोग करावा.
‘हर्बल टी’ नक्की ट्राय करुन पाहा
हिवाळ्यात आपल्या शरीराला अनेक आजारांनी घेरले असते. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आपले शरीर निरोगी आणि मजबूत ठेवणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या मोसमात घसा खवखवणे, सर्दी, खोकला, अंगदुखी होणे हे सामान्य आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपण काही हर्बल टीचा आहारात समावेश केला पाहिजे.हळद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही उकळलेल्या पाण्यात अर्धा चमचा हळद घालून ते पिऊ शकता. हळद शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.आल्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात. जे अनेक रोगांशी लढण्यास मदत करतात. आले चहाला किंचित मसालेदार चव येते आणि कॅफिनयुक्त आणि हर्बल चहा दोन्हीमध्ये एक लोकप्रिय आहे.पुदिन्याचा चहा हा आणखी एक लोकप्रिय हर्बल चहा आहे. त्यात प्रतिजैविक आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमचे अनेक रोगांपासून संरक्षण होतेलोक सहसा काळ्या चहाचे सेवन करतात.त्यात अँटीव्हायरल गुणधर्म असलेले कॅटेचिन असतात, जे शरीराला आजारी पडण्यापासून वाचवतात.ग्रीन टी हे सर्वात लोकप्रिय आणि मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या पेयांपैकी एक आहे, कारण हे विविध प्रकारचे आरोग्य फायदे देते. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात चांगली करायची असेल तर आपण ग्रीन टी घेतली पाहिजे. ग्रीन टी चिंता कमी होण्यास मदत करते.वजन कमी करण्यासाठी कॅमोमाइल चहा सर्वोत्तम पेय मानला जातो. आपल्यालाही आपले वाढते वजन नियंत्रित करायचे असेल, तर रात्री झोपेच्या आधी कॅमोमाइल चहा पिणे विसरू नका. असे केल्याने केवळ तुमचे वजनच नियंत्रित होणार नाही, तर तुम्हाला झोपही चांगली मिळेल.
थंडीत आजारांपासून दूर राहण्यासाठी खा गूळ
आयुर्वेदात गुळाला मोठे महत्त्व आहे. शरीरातील रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी गूळ फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसात गुळाचे सेवन शरीरासाठी आवश्यक असते. जाणून घ्या गुळाचे हे फायदे
फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते – गुळामध्ये सेलोनियम हे तत्व असते जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. यामुळे गळ्याचे तसेच फुफ्फुसांमध्ये इन्फेंक्शन होत नाही. फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते.
कफाच्या त्रासावर गुणकारी – थंडीत कफाचा त्रास अधिक जाणवतो.यावेळी गुळाचा चहा पिणे लाभदायक असते. थंडीच्या दिवसांत गूळ, आलं आणि तुळशीच्या पानांचा काढा प्यावा. यामुळे अनेक आजार दूर राहतात.
सर्दीवर रामबाण उपाय – गूळ आणि तीळ एकत्रित खाल्ल्याने सर्दीचा त्रास होत नाही. यामुळे
अस्थमाचा त्रास दूर होतो – एक कप किसलेला मुळा, गूळ आणि लिंबूचा रस एकत्रित करुन 20 मिनिटे हे मिश्रण शिजवा. हे मिश्रण नियमित खा. अस्थमाच्या त्रासावर हे मिश्रण गुणकारी आहे.
(टीप : ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे.लेखात सुचविलेल्या टीप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहिती देतात.)
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा
वीजप्रवाह : पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय रस्त्यांवर गाडी चालवणे हा दंडनीय गुन्हा…
‘सचेत’ प्रणाली- आपत्ती काळातील ‘संदेशदुत’