Last Updated on 13 Jan 2026 2:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सोशल मिडियाच्या अध्यक्षपदी विशाल माने (केदारगांव) यांची निवड करण्यात आली. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी जि. प.उपाध्यक्ष रणजित पाटील, नेर्ले गावचे लोक नियुक्त सरपंच संजय पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.
विशाल माने यांनी यापूर्वी सोशल मिडीयाचे गांव अध्यक्ष,तालुका उपाध्यक्ष म्हणून समर्थपणे जबाबदारी पार पाडली असून ते सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन पक्षाचा सोशल मिडिया अधिक सशक्त करतील, असा विश्वास प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – बोरगावात राजकीय उलथापालथ; काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, युवा नेते प्रतिकदादा पाटील व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे, तो मी कामातून सार्थ करून दाखवेन, असा विश्वास विशाल माने यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रारंभी पेठचे उपसरपंच रविकिरण बेडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राहुल पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी सोशल मिडियाचे तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.









































































