Last Updated on 11 Jan 2026 5:24 PM by Sanjay Patil/Adhorekhit
विकास–अमोल पाटील बंधूंसह चार जणांचा पक्षप्रवेश; आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त
सांगली ।
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते विकास वसंतराव पाटील, अमोल वसंतराव पाटील या बंधूच्यासह अर्जुन जाधव, सुनील परीट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे पक्षात स्वागत केले. “आम्ही आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे,”अशी भावना प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी आ.जयंत पाटील म्हणाले, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात योग्य तो मानसन्मान ठेवला जाईल.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, राजारामबापू सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, राजारामबापू दूध संघांचे संचालक धैर्यशील पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजीराव वाटेगावकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष देवराव देशमुख, माजी उपसरपंच विकास पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते लालासाहेब वाटेगावकर, युवक काँग्रेसचे बोरगाव अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह बोरगावमधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 22 Jan 2026 10:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit ➤ आणखी १० लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण ➤ ८३ टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक ➤ एकूण १८ देशांमधून महा... Read more











































































