मुंबई । महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या लाभाचं वितरण आजपासून सुरु होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. आदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांनी दोन महिन्यांच्या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करुन घेण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं.
आदिती तटकरे पुढं म्हणाल्या, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती, असं आदित तटकरे यांनी म्हटले.
Recent Posts
बातमी शेअर करा : थंडीचा एखादा झोत अंगावरून गेला की आपले शरीर थरथरते आणि काही तरी गरम गरम हवेसे वाटायला लागते. परंतु गरम कपड्यांनी फार काही साध्य होत नाही. शेवटी गरम कपडे हा बाहेर... Read more










































































