Last Updated on 19 Jul 2025 11:09 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा सहकारी बँकेचे संचालक शिवाजीराव मुरारजी पाटील यांच्या मातोश्री सौ. अनुसया मुरारजी पाटील (वय ७९) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. राजारामबापू कारखान्याचे शेती विभागाचे गटाधिकारी प्रणिल पाटील यांच्या त्या आजी होत. दशक्रिया विधी २७ जुलै रोजी तर उत्तरकार्य ३० जुलै २०२५ रोजी बहे येथे होणार आहे.












































































