बदलापूर । आपल्या आठवणी, अनुभव यांच्या आधारे स्वतः ला व्यक्त करताना सामान्य माणूस हाच कैलास कांबळे यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे असे प्रतिपादन प्राचार्य दिलीपकुमार कांबळे यांनी व्यक्त केले. ‘मनातील कवडसे’या कैलास कांबळे लिखित ललितलेख संग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी बदलापूर (जि. ठाणे) येथे ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी सदानंद सुरोशे, अध्यक्ष शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कुळगाव-बदलापूर हे होते तर प्रमुख पाहुणे पद्माकर बाविस्कर, मुख्याध्यापक, कै. द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय (माध्यमिक विभाग ) हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेखक कैलास कांबळे यांनी ‘मनातील कवडसे’ या पुस्तकाच्या लेखनामागील आपली भूमिका विशद केली. लहानपणी वडिलांच्या संगतीत वर्तमानपत्र वाचनाची सवय लागली त्यातूनच पुढे लेखणाची आवड निर्माण झाली,असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद सुरोसे यांनी लेखकाच्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडताना त्याचे प्रतिबिंब लेखनात कसे उमटले आहे हे सोदाहरण स्पष्ट केले. तर मा. पद्माकर बाविस्कर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा ही कैलास कांबळे यांच्या लेखनाच्या मुळाशी आहे त्यामुळेच यातील लेख दर्जेदार झालेले आहेत. याप्रसंगी त्यांनी ‘मनातील कवडसे ‘मधील लेख इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा मनोदय व्यक्त केला.
सूत्रसंचालन मा. भगवान गायकवाड यांनी केले. तर आभार बाळू पाटील, अध्यक्ष फॉर्मर बँक (महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ) यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र कांबळे (माजी राज्यकर अधिकारी ) यांनी केले.कार्यक्रमाला मोठया संख्येने रसिक उपस्थित होते.
Recent Posts
बातमी शेअर करा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व सचिव सुभाष चौगुले यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांचे नुकसान टळले विमला गोयंका कॉलेजच्या... Read more