Last Updated on 26 Oct 2024 10:50 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । शिवसेना उद्धव ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत ठाकरे गटाने एकूण १५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत ठाकरे गटाने ६५ नावांची घोषणा केली होती. त्यामुळे आतापर्यंत ८० उमेदवारांची घोषणा ठाकरे गटाने केली आहे.
या यादीमध्ये मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव वडाळ्यामधून उमेदवारी दिली आहे. भायखळ्यात मनोज जामसुतकर यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपमधून राष्ट्रवादी त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटामध्ये प्रवेश करणारे माजी आमदार अनिल गोटे यांना धुळे शहरातून उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतील तीन ठाण्यामधील, दोन जागांवर उमेदवार दिला आहे.
शिंदे गटाच्या विद्यामान आमदार यामिनी जाधव यांच्याविरुद्ध ठाकरे गटाने भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर यांना उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा – अजित पवारांचा जयंत पाटील यांना घेरण्यासाठी मोठा डाव; राष्ट्रवादीकडून लढणार तगडा उमेदवार
हेही वाचा – महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार
वाचा संपूर्ण यादी…कोणाला कुठून मिळाली उमेदवारी
धुळे शहर- अनिल गोटे,
चोपडा -(अज) राजू तडवी,
जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,
बुलढाणा- जयश्री शेळके,
दिग्रस -पवन श्यामलाल जयस्वाल,
हिंगोली- रूपाली राजेश पाटील,
परतूर- आसाराम बोराडे,
देवळाली (अजा) योगेश घोलप,
कल्याण पश्चिम- सचिन बासरे,
कल्याण पूर्व – धनंजय बोडारे,
वडाळा- श्रद्धा श्रीधर जाधव,
शिवडी- अजय चौधरी,
भायखळा- मनोज जामसुतकर,
श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे,
कणकवली- संदेश भास्कर पारकर












































































