उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असा कुठलाही ऋतू असो भजी असा पदार्थ आहे, ज्याला कुठल्याही कधीही नकार देता येत नाही. भजीचे अनेक प्रकार असतात. ब्रेड पकोडा, कांदे भजी, बटाट्यचे भजी, मिरची भजी, ही त्यातील काही विशेष लोकप्रिय असणारे प्रकार आहेत. भज्यांची एक विशेषता म्हणजे, बेसनामध्ये कुठलीही भाजी घाला आणि एक नवीन प्रकारचे भजी तयार होतात. भज्याचे अगदी सोप्या पद्धतीने आणि नवनवीन प्रकार करता येतात. सोबतच गरमागरम भजी हे अगदी चविष्ट असल्याने लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात.
चला तर आज जाणून घ्या, आरोग्यासाठी फायदेशीर मेथीचीभजी अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवता येईल.
सामग्र
बेसन- १ वाटी
बारिक चिरलेली मेथीची भाजी- १/२ कप
धने -१ छोटा चमचा
हिरवी मिरची-४ (बारिक चिरलेली)
बारिक चिरलेला कांदा – १
ओवा- आवडीनुसार
जीरे – १ छोटा चमचा
मीठ- गरजेनुसार
तिखट-१ छोटा चमचा
हळद-१/२ छोटा चमचा
हिंग-चुटकीभर
बेकिंग सोडा- चुटकीभर
तेल-तळण्यासाठी
हेही वाचा – चवदार आणि पौष्टिक ‘बाजरीची खिचडी’… जाणून घ्या रेसिपी
कृती
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये धने, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ओवा, जिरे, मीठ, तिखट, हळद, घालून चांगल्याने मिक्स करून घ्या. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि मेथी घाला. आता यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात पाणी घालून भाज्यांचे मिश्रण तयार करून घ्या. पाणी घालताना लक्षात ठेवा मिश्रण थोडे घट्ट बनवायचे आहे. मिश्रण तयार झाले की ते बाजूला ठेऊन द्या. आता एका फ्राइंग पॅन किंवा कढई मध्ये तळण्यासाठी तेल गरम करा. तेल गरम झाले की गॅस मंद करा. आता मिश्रणात हिंग, बेकिंग सोडा घाला आणि यावर छोट्या चमचा गरम तेल घाला. आता चमच्याच्या मदतीने तेल मिश्रणात चांगल्याने मिक्स करून घ्या. आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे भजे तेलात टाका. भजे एका बाजूने हलके तपकिरी रंग जखले की चमच्याच्या मदतीने पालटून द्या. आता दोन्ही बाजूने भजे खुशखुशीत झाले की एका प्लेटमध्ये काढून घ्या. गरमागरम भजी तयार आहेत.