Last Updated on 05 Aug 2024 9:44 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । महसूल विभागातील तलाठी, मंडल अधिकारी, कारकून, अव्वल कारकून आदी कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या मे महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे या बदल्या रखडल्या होत्या. मात्र, शासनाने या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास मंजुरी दिली असून, येत्या 15 ऑगस्टपर्यंत या बदल्या करण्यात याव्यात, अशा सूचना शासनाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
निवडणूक आचारसंहितेमुळे महसूल विभागाच्या गट-ब (अराजपत्रित) संवर्ग, गट-क संवर्ग व गट-ड संवर्गाच्या एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण नियतकालिक बदल्या झालेल्या नाहीत.

पुणे महसुल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या…
सचिन पाटील वाळवा-इस्लामपूरचे नवे तहसीलदार…
कोयना धरणात ‘इतका’ टीएमसी पाणीसाठा, पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच…
गट-ब (अराजपत्रित) संवर्ग, गट-क संवर्ग व गट-ड संवर्गात बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम,2005 मधील नियम 4(4) नुसार, सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या दि.15 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्याची कार्यवाही करावी,असे निर्देश आहेत.याबाबतचे पत्र महसूल विभागातील कक्ष अधिकारी स.र. दळवी यांनी काढले आहे.












































































