सांगली । वाळवा-इस्लामपूरचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांची बदली झाली असून आता सचिन पाटील हे वाळवा-इस्लामपूरचे नवे तहसीलदार असणार आहेत.
महसूल खात्याने तहसीलदारांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. पुणे विभागातील १२ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.
वाळवा-इस्लामपूरचे तहसीलदार प्रदीप उबाळे यांची तहसीलदार तथा विशेष कार्य दंडाधिकारी कोल्हापूर येथे बदली झाली आहे.वाळवा-इस्लामपूरचे नवे तहसीलदार म्हणून सचिन पाटील यांची बदली झाली आहे. तहसीलदार पाटील हे याआधी भोर (जि. पुणे) येथे कार्यरत होते.तेथून त्यांची इस्लामपूर येथे बदली झाली आहे.
पुणे विभागातील तहसीलदारांच्या बदल्या; जाणून घ्या कुणाची कुठे झाली बदली…