व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार
मुंबई । अर्थमंत्री अजित पवारांनी आज राज्याचा उर्वरित अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.
मागच्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 21 ते 60 वर्षांतील महिलांना दरमहा 1500 रुपये देणार असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली. यासाठी 46 हजार कोटींची तरतूद केली असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करताना अर्थमंत्री नेमकं काय म्हणाले?
स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. लेकी-बहिणींसाठी मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील.मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.
या योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षे वयोगटातील महिला पात्र असतील.
राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी, तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्त्वपूर्ण योजना घोषित करण्यात आलीय.
या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
राज्यातील विवाहित, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
किमान वयाची 21 वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत
सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
कोण अपात्र असेल?
या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही, हेही सरकराने स्पष्टपणे नमूद केलंय.
या योजनेच्या लाभासाठी खालील कागदपत्रे आवश्यक :
योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
लाभार्थ्याचे आधार कार्ड
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखल
सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
पासपोर्ट आकाराचा फोटो
रेशनकार्ड
सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे?
योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अॅपद्वारे/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल :
(1) पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.
(2) ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/ग्रामपंचायत/वार्ड/सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील.
(3) वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी)/सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल.
(4) अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल.
(5) अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि E-KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे.
कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड)
स्वतःचे आधार कार्ड
राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोफत विजेसह ‘या’ मोठ्या घोषणा
आता वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार… इतक्या महिलांना मिळणार लाभ
वाळू धोरणामध्ये सरकारने घेतला हा मोठा निर्णय़…
मोठी घोषणा : राज्यातील मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण
महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे
🌑 राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील.
🌑 महिलांना बस प्रवासात सवलत.
🌑 महिलांना मुद्रांक शुल्कात सवलत.
🌑 वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत दिले जातील.
🌑 बचत गटाच्या निधीत 15 हजारांवरुन 30 हजार निधी
🌑 यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचा शासनाचा विचार