सांगली । नेर्ले (ता. वाळवा) येथील ग्रामरोजगार सेवक सुजाता रामराव पवार (रा. बहे) यांचा आज वाळवा पंचायत समितीत गुणवंत ग्रामरोजगार सेवक म्हणून सत्कार करण्यात आला.
वाळवा पंचायतीत आज (शुक्रवारी) ९४ ग्रामरोजगार सेवकांना टॅब वाटप तसेच ७ गुणवंत ग्रामरोजगार सेवकांचा सत्कार करण्यात आला.
वाळवा पंचायतीत आज ९४ ग्रामरोजगार सेवकांना प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार प्रदीप उबाळे,गट विकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्या हस्ते टॅब वाटप करण्यात आले.यावेळी सुनील गावडे,सुजाता पवार,विष्णू थोरात,प्रताप चटणे, सुहास पाटील,शिवाजी गायकवाड,रामचंद्र घारगे या 7 गुणवंत ग्रामरोजगार सेवकांचा सत्कार करण्यात आला.
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार,विकास शिंगटे,मच्छिंद्र पाटील,जनार्दन गायकवाड आदींनी संयोजन केले.सुनील गावडे यांनी आभार मानले.