Last Updated on 03 Nov 2023 12:03 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणामुळे स्थगित केलेली राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा आज (शुक्रवार) पासून पुन्हा सुरु होणार आहे.याची सुरवात राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथून आज,शुक्रवारी सकाळी 8 वाजता होणार आहे.
मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण गुरुवारी सायंकाळी स्थगित झाले आहे.या उपोषणास पाठिंबा म्हणून राजू शेट्टी यांनी 22 दिवसाची 522 किलोमीटरची आक्रोश यात्रा 13 व्या दिवशी स्थगित केली होती.
हेही वाचा – ‘कृष्णे’च्या पट्ट्यात ‘स्वाभिमानी’ आक्रमक…ऊसतोडी बंद पाडल्या, ट्रॅक्टरही रोखले
त्या पदयात्रेस आज शुक्रवारी सकाळी 8 वाजता राजारामबापू साखर कारखाना साखराळे येथून सुरवात होणार आहे.सकाळी ठिक 7 वाजता राजू शेट्टी हे त्यांच्या निवासस्थानापासून साखराळेकडे रवाना होणार असून 8 वाजता कारखाना प्रशासनास निवेदन देवून तिथून हुतात्मा कारखाना -नागठाणे-अंकलखोप-भिलवडी व वसगडे मुक्कामी असणार आहे.दि. 7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे 22 व्या ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होईल.
सर्व उस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी ठिक 7.30 वाजता राजारामबापू कारखाना,साखराळे येथे उपस्थित रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी केले आहे.









































































