अधोरेखित ऑनलाइन डेस्क । घरोघरी गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे.गणेशाच्या स्थापनेआधी आकर्षक सजावट असो किंवा अगदी हाताने मूर्ती घडवणं असो सगळ्याच कामांची लगबग सुरु आहे.उद्या बाप्पा येतोय म्हटल्यावर नैवेद्याचीही खास तयारी सुरु असते.स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक मातीची गणेश मूर्ती बनवून घरी गणपतीची प्रतिष्ठापना करताना वेगळाच आनंद असतो.इस्लामपूर येथील अन्नपूर्णा प्रभाकर जंगम या युवतीने स्वत: मातीने बाप्पाची मूर्ती घडवली आहे.स्वतःच्या हाताने साकारलेल्या मातीच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आनंद शब्दात सांगणे कठीणच असल्याचे तिने सांगितले.
यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची तयारी सर्वत्र जोरात सुरू आहे.अशा परिस्थितीत जर तुम्ही घरी स्वतःच्या हाताने साकारलेल्या मातीच्या बाप्पाची प्रतिष्ठापना करत असाल तर पर्यावरणाबाबत जनजागृतीला हातभार लागण्यास एकप्रकारे मदत होत असते.पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी इस्लामपूर येथील विनायकनगर येथे राहणाऱ्या अन्नपूर्णा जंगम या युवतीने स्वत: मातीने बाप्पाची मूर्ती घडवली आहे.
डिझायनिंग क्षेत्रातील पदवी घेतलेल्या अन्नपूर्णाने साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीची काय आहे कहाणी! ती म्हणाली,माझे घरी आई-वडील क्रिएटिव्ह असल्यामुळे व घरातील वातावरण आर्टिस्टिक आणि क्रिएटिव्ह असल्यामुळे लहानपणापासूनच क्रिएटिव गोष्टी बनवण्याची आवड होती.पण प्रत्यक्ष मूर्ती मात्र कधीच बनवली नव्हती.असेच कुंडीत झाड लावण्यासाठी माती भरत होते.माती पाहिल्यानंतर आणि गणपती नुकतेच येणार आहेत याची कल्पना मनात आल्यानंतर आपण या माती पासून आपणास गणपती बनवता येईल का ? तसा प्रयत्न करून पहावा म्हणून ती माती मी सहज चाळून घेऊन प्रयत्न केला आणि त्याला सहज आकार देत गेले आणि सहजच मूर्ती जमून गेली .मला फारच आनंद झाला.कारण प्रत्यक्ष मी बाप्पाची पहिल्यांदाच मूर्ती बनवत होते.
हेही वाचा – ‘गणेश चतुर्थी’ : शास्त्र काय सांगते?…जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त
ती म्हणाली, बाप्पाला आकार देत असताना घरच्या लोकांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी प्रयत्न करत गेले.मूर्ती छान बनत गेली.प्रत्यक्ष मूर्ती तयार झाल्यानंतरचा आनंद शब्दात सांगणे कठीणच! मूर्ती बनवल्यानंतर एक महिन्यांनी पूर्ण वाळली.मूर्ती वाळल्यानंतर थोडेसे शेतातीलच माती असल्यामुळे त्याला चरे पडले होते.ते चरे परत मातीने भरून घेऊन परत काही दिवस मुर्ती वाळत ठेवली.पूर्ण वाळल्यानंतर मग नंतर रंग कामासाठी घेतली.रोज माझ्या सवडीनुसार पंधरा-वीस मिनिटे याप्रमाणे आठ ते दहा दिवसांमध्ये पूर्ण रंगवून बाप्पाची मूर्ती झाली.मी शिकत असताना काही रंग माझ्याकडे शिल्लक होते ते आणि घरी उपलब्ध असणारे रंग वापरूनच मूर्ती रंगवली.
हेही वाचा – गौरी पूजन : समज,गैरसमज; जाणून घ्या
पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर कसे वाटले असे विचारल्यानंतर ती म्हणाली,फारच छान,खरं तरं हे शब्दात सांगणे फारच कठीण.या निमित्ताने गणपती बाप्पाच्या रूपाने माझ्यातील एक शिल्पकार जागा झाला.