Last Updated on 13 Sep 2023 8:28 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । जर आपल्याकडे ज्ञानाचा खजिना असेल तर आपण जीवनातील प्रत्येक समस्येवर मात मिळवू शकतो असे प्रतिपादन मराठी भाषा संचालनालय,मंत्रालय-मुंबई येथील अनुवादक आनंद गांगण यांनी केले.
परळच्या महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालयात “मराठी भाषा आणि वाड.मय मंडळ” तसेच ‘स्पंदन’ या भित्तीपत्रकाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.मराठी भाषा आणि वाड.मय मंडळाच्यावतीने होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा असेही आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा – राज्यात 13 तारखेनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार; या जिल्ह्यात पडणार पाऊस
विद्यार्थ्यांनी स्वतःला सद्याच्या काळात अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे तसेच जीवन जगत असताना आपले छंद जोपासणे महत्वाचे असून वाचन हा एक उत्तम छंद होऊ शकतो.सद्या वाचनाशिवाय पर्याय नाही.अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त वैचारिक साहित्य वाचणेही अत्यंत गरजेचे आहे असे मत मांडले.यासाठी त्यांनी अच्युत गोडबोले यांच्या साहित्याचा मुलांना परिचय करून दिला.
हेही वाचा – नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर आता कारवाईचा बडगा
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार कांबळे उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.सुप्रिया शिंदे यांनी केले.तर आभार प्रा. आभा चिमण यांनी मानले.या कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































