Last Updated on 13 Sep 2023 8:29 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । यंदा तब्बल 102 वर्षानंतर सर्वात कमी पाऊस ऑगस्ट महिन्यात झाला.सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस परतला.त्यामुळे धरणांमध्ये जलसाठा वाढला.पुढचे एक-दोन दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.राज्यात 13 तारखेनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे.तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे.पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाया जात आहेत.दरम्यान,विदर्भ,मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तसेच मुंबईसह कोकण आणि नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे या जिल्ह्यातील धरणसमूहात जलसंवर्धन होवून धरणसाठा टक्केवारीतही वाढ होवु शकते.
हेही वाचा – नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर आता कारवाईचा बडगा
हवामान विभागाचा अंदाज असा
13 सप्टेंबर : विदर्भात गडचिरोली,चंद्रपुर,गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
14 सप्टेंबर : विदर्भात गडचिरोली,चंद्रपुर व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.विदर्भ,मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
15 सप्टेंबर : मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात तसेच कोल्हापुरातील घाट भागात; मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात आणि विदर्भ विभागात अमरावती,अकोला, यवतमाळ, बुलढाणा,वाशीम,चंद्रपुर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
16 सप्टेंबर : कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागीरी व रायगड जिल्ह्यात, मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव,सातारा आणि कोल्हापुर जिल्ह्यातील घाट भागात मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर,हिंगोली,नांदेड व जालना जिल्ह्यात; विदर्भातील बुलढाणा,वाशीम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.विदर्भ,मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
कृषि विभागाचा सल्ला असा
कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील; मध्य महाराष्ट्रातील धुळे,जळगाव,सातारा जिल्ह्यात आणि कोल्हापुर जिल्ह्यातील घाट भागात मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, हिंगोली नांदेड व जालना जिल्हयातील विदर्भातील अमरावती,अकोला,गडचिरोली,चंद्रपुर,गोंदिया, बुलढाणा,वाशीम,यवतमाळ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिके, भाजीपाला पिके व फळ बागांतून पुरेशा पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करावी असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कोकण,मध्य महराष्ट्र,मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांनी पुढील 2-3 दिवसांत खरीप पिकाना खते व कीटकनाशके पावसाची उघडीप पाहून व स्वच्छ वातावरणात द्यावी.कोकण,मध्य महराष्ट्र,मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की,मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याच्या कालावधीत जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे,असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.









































































