Last Updated on 23 Jul 2024 8:33 AM by Sanjay Patil/Adhorekhit
पायथा विद्युतगृहातून आजपासून पाण्याचा विसर्ग, कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस
सांगली । कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामुळे धरणांमध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे आज, दि. 23 जुलै 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू करून 1050 क्युसेक्स इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता 24 तासात कोयना धरणामध्ये साधारण 163 मिलिमीटर, नवजा येथे 145 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 140 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सोमवारी सकाळी आठ नंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे 105 टीएमसी क्षमता असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 64.55 टीएमसी इतका झाला असून धरण 61.33 टक्के भरले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 47 हजार 693 क्युसेस इतकी सुरू आहे. गतवर्षी कोयना धरण 37.36 क्षमतेने भरले होते. यंदा मात्र पाणलोट क्षेत्रात वरूणराजाची दमदार बरसात सुरू आहे.
एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 2 हजार 732 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 228 आणि महाबळेश्वरमध्ये 2 हजार 644 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
हेही वाचा – अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती : काय करावे आणि काय करु नये…
कोयना धरण
दि.23/07/2024 वेळ: सकाळी 08:00 वाजता
पाणीपातळी: 2123’09” (647.319मी)
पाणीसाठा: 64.55 टीएमसी (61.33%)
आवक:- 47,693 क्यूसेक्स पायथा ग्रहातून 00 क्यूसेक्स विसर्ग कोयना नदीपत्रात सुरु आहे
पाऊस मि मी (आज/एकूण)
कोयना 163/2732
नवजा 145/3228
महाबळेश्वर 140 /2644
पूर नियंत्रण कक्ष, सांगली पाटबंधारे विभाग सांगली.
दिनांक–23/07/2024 8:00 AM
पाणी पातळी – (फूट इंचामध्ये)
(धोका पातळी/आत्ताची पातळी )
1)कृष्णा पूल कराड-(55.0)/14’8″
2) बहे पूल-(23.7)9’0″
3) ताकारी पूल (46)/27’0″
4)भिलवडी पूल -(53)28’4″
5)आयर्विन- (45)/27’00”
6)राजापूर बंधारा-(58)/41’05”
7) राजाराम बंधारा-(43)/40’8″
पाणीसाठा (TMC)/विसर्ग (क्यूसेक्स मध्ये)
1) कृष्णा पूल कराड- 23632
2) आयर्विन पूल – 49108
3) राजापूर बंधारा – 120125
4) राजाराम बंधारा – 60361
5) कोयनाधरण- 64.55 TMC/00
6)वारणा धरण- 28.15 TMC/ 1648
7)अलमट्टी धरण- 91.828
आवक – 128763
जावक- 150000












































































