Last Updated on 07 Dec 2024 8:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
आपली जुनी पिढी म्हणजे आपले आजी-आजोबा अगदी आपले आई-बाबा काळा चहा प्यायचे किंबहुना बरेच जण अजूनही पितात.मात्र सध्याच्या काळात कटिंग चहा पिणारे लोक दुधाची चहा पिणेच जास्त पसंत करतात.आपल्याला काळा चहा पिणे बेचव वाटते. पण तुम्हाला माहित आहे का गावाकडील बहुतांशी लोक कोरा चहाच पिणे पसंत करतात. कारण त्याला तशी खास कारणेही आहेत. काळाचहा हा शरीरासाठी खूप औषधी आणि गुणकारी आहेत. हा चहा अनेक आजारांवर उपाय ठरू शकतो.काळा चहा हा दिसायला देखील बेरंग किंवा बेचव वाटत असला तरी त्याचे फायदे खूपच चांगले आणि गुणकारी आहेत. प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या व्यक्तीस हा काळा चहा खूपच फायद्याचा ठरू शकतो.
- भारतासह संपुर्ण जगभरात सर्वाधिक पिले जाणारे पेय म्हणजे चहा होय. साधारण जगभरातील कित्येकांच्या दिवसाची सुरुवात ही चहाने होत असते. चहा पिल्यानाही तर अनेकांना चुकल्या चुकल्या सारखे वाटते. साधारण सकाळी आणि संध्याकाळी एकदा असा चहा पिण्याचा अनेकांचा दिन क्रम असतो. तर अनेक लोक दिवसातुन 8 ते 10 वेळा देखील चहा पितात. मात्र हाच चहा म्हणजेच दुधाचा चहा हा आरोग्याला चांगला नसल्याचे म्हणणे आहे. अशातच मग आजकाल अनेक लोक ग्रीन टी, ब्लॅक टी घेतात. हा काळा चहा पिण्याचे अनेक फायदे असून, आरोग्याच्या दृष्टीने देखील काळा चहा गुणकारी ठरतो कसा ते पाहा.
काळ्या चहामध्ये असलेल्या गुणकारी औषधांमुळे काळा कित्येक रोगांवर मात करतो.
थकवा तसेच अशक्त पणा
अनेकदा आपण लांबचा प्रवास करतो, उन्हात फिरतो, श्रमाचे एखादे काम करतो अशा वेळी आपल्याला अशक्त पणा जाणवतो, तसेच आपल्याला थकवा येतो. अशा वेळी काळा चहा पिणे गुणकारी छरते, काळ्या चहामुळे तरतरी येते. थकवा आणि अशक्त पणा नाहीसा होतो. काळा चहा शरीरातील कार्यक्षमता वाढण्यास मदत करतो.
मधुमेह
आजकाल साधारण 35 नंतर मधुमेहाची सुरवात होते. जगभरात वेगाने वाढणारा आणि आजकाल कोणालाही होणाऱ्या मधुमहाच्या रुग्णांसाठी काळा चहा लाभदायी ठरतो. यातील पॉलीफेनॉल्समुळे इन्सुलिनच्या संवेदनशीलतेत सुधारणा होऊन मधुमेहासारख्या आजाराला लांब ठेवू शकतो.
फुफुस्साचा कर्करोग
वाढते प्रदुषण तसेच तरुणांमधील सिगारेट पिण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे फुफुसाचा कर्करोग होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशात नियमित काळा चहा फुफुस्सावरील कर्करोग होण्यापासून लांब ठेवतो.
मुतखडा
मुतखडा हा आजकाल अनेक तरुणांना देखील होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नियमत काळा चाहा मुतखडा होण्यापासून दुर ठेवतो. काळा चहा नियमीत पिल्याने मुतखडा होण्याचे प्रमाण 8 टक्के कमी होते.
पोटाचे विकार
पोटांच्या विकारावर काळा चहा अत्यंत गुणकारी आहे. काळा चहा अॅसिडीटीचा त्रास कमी करतो, काळा चहा पिल्याने पचन क्रिया सुरळीत होते. उलट्या होत असल्याचे तसेच मळमळ कमी करण्यासाठी काळा चहा पितात.
ह्रदयाचे आजार
नियमितपणे काळा चहा प्यायल्यामुळे हृदयाच्या धमण्यांची कार्यक्षमता वाढते आणि धमणी आकुंचन पावण्याची शक्यताही खूप कमी होते. त्यामुळे हृदयाशी निगडीत आजार कमी होण्यास मदत होते. या व्यतीरिक्तही काळा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत.








































































