Last Updated on 08 Sep 2023 5:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील प्रकाश पब्लिकच्या उपप्राचार्या सिंधू नायर यांना सिंघानिया एज्युकेशन ग्रुपच्या वतीने ‘उत्कृष्ट प्राचार्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण देशपातळीवर विविध राज्यात सर्वेक्षण करून शैक्षणिक क्षेत्रात सुधारणात्मक बदल घडवणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांना या पुरस्काराने सन्मानित केले.सौ. नायर यांनी प्रकाश शिक्षण संकुलातील प्रकाश पब्लिक स्कूलमध्ये विविध शैक्षणिक कार्यात नाविन्यपूर्ण सुधारणात्मक बदल घडवून आणून शाळेचा देशपातळीवर नावलौकिक केला.
त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन सिंघानिया एज्युकेशन ग्रुपने त्यांना ‘उत्कृष्ट प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित केले.
सौ. नायर यांच्या शैक्षणिक कार्यामुळे शाळेचा नावलौकिक झालेला आहे त्याचे कार्य खरचं कौतुकास्पद व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.त्यांना मिळालेल्या या सन्मानाने प्रकाश शिक्षण संकुलामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे असे प्रकाश शिक्षण संकुलाचे संस्थापक निशिकांत भोसले–पाटील म्हणाले.शाळेच्या प्रशासिका सौ सुनिता निशिकांत भोसले–पाटील,प्राचार्या डॉ.मधुकुमार नायर तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांनी अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा – ‘गणेश चतुर्थी’ 19 सप्टेंबरलाच; शास्त्र काय सांगते?…






































































