Last Updated on 22 Nov 2022 7:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची माहिती
सांगली | जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात व परतीचा पाऊस यामुळे तलाव,विहिरींच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असल्याने भूजल पाणी पातळीत वाढ झाली आहे.यंदा ऑक्टोबर 2022 अखेर जिल्ह्यातील भूजल पातळीत 0.97 मीटरने वाढ झाली असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा,सांगली कार्यालयामार्फत देण्यात आली.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, कार्यालयामार्फत ऑक्टोबर 2022 अखेर जिल्ह्यातील 86 विहिरींचे निरीक्षण करण्यात आले आहे. यामये ऑक्टोबर 2022 मध्ये 2.68 मीटर स्थीर भूजल पातळी आढळून आली. ही वाढ सरासरी 0.97 मीटर इतकी आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील 6 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 2.45 मीटर असून ऑक्टोबर अखेर 0.13 मीटरची वाढ आढळून आली.
जत तालुक्यातील 20 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 3.39 मीटर असून ऑक्टोबर 2022 अखेर 1.85 मीटरची वाढ आढळून आली. खानापूर तालुक्यातील 9 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 2.94 मीटर असून ऑक्टोबर अखेर 1.13 मीटरची वाढ आढळून आली. वाळवा तालुक्यातील 6 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 1.61 मीटर असून ऑक्टोबर अखेर 0.33 मीटरची वाढ आढळून आली. तासगाव तालुक्यातील 3 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 4.42 मीटर असून ऑक्टोबर अखेर 1.31 मीटरची वाढ आढळून आली. शिराळा तालुक्यातील 6 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 0.89 मीटर असून ऑक्टोबर अखेर 0.21 मीटरची वाढ आढळून आली.
आटपाडी तालुक्यातील 13 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 3.29 मीटर असून ऑक्टोबर अखेर 1.09 मीटरची वाढ आढळून आली. कवठेमहांकाळ तालुक्यातील 15 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 2.67 मीटर असून ऑक्टोबर अखेर 1.85 मीटरची वाढ आढळून आली. पलूस तालुक्यातील 2 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 1.45 मीटर असून ऑक्टोबर अखेर 1.15 मीटरची वाढ आढळून आली आणि कडेगाव तालुक्यातील 6 विहिरींची तपासणी करण्यात आली असता स्थीर भूजल पातळी 3.65 मीटर असून ऑक्टोबर 2022 अखेर 0.63 मीटरची वाढ आढळून आली.












































































