Last Updated on 22 Apr 2026 2:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महिन्यात काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी देणार – प्रतिकदादा पाटील
ईश्वरपूर ।
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना पुरस्कृत वाटेगांव संयुक्त सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या वतीने माणिकवाडी विभागात ३३ लाख रुपयांच्या नवीन पाईप लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला. राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांच्या हस्ते आणि साखर कारखान्याच्या जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदिपकुमार पाटील,संचालक अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला.
प्रतिकदादा पाटील म्हणाले, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांची दूरदृष्टी आणि अथक परिश्रमातून ही संस्था उभा राहिली असून वाटेगांव, भाटवडे, शेणे, काळमवाडी, माणिकवाडी, महादेववाडी आणि नायकलवाडी या गावांच्या विकासाला मोठी चालना मिळाली. संस्थेच्या पाईप लाईनच्या शेवटच्या भागात पुरेसे पाणी मिळण्यात काही अडचणी होत्या, आपली बऱ्याच वेळा चर्चा झाल्या. आपल्या सूचनेप्रमाणे हे काम करीत आहोत. हे काम महिन्याभरात पूर्ण होऊन माणिकवाडी,महादेववाडी व नायकलवाडीच्या शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळेल.
अतुल पाटील म्हणाले,आमच्या पेठ गावात पाणीपुरवठा संस्था झाली नाही, त्याचा फटका आमच्या गावाला बसला. पाणीपुरवठा संस्थेमुळे आपल्या गावांची प्रगती गतीने झाली आहे.
प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष अशोक देवकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर उपाध्यक्ष राजाराम यादव यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला. राजारामबापू दुध संघाचे माजी संचालक हरिशचंद्र औताडे यांनी आभार मानले.
याप्रसंगी राजारामबापू सह.बँकेचे संचालक नामदेव मोहिते,राजारामबापू सह. दूध संघाचे संचालक संजय शिंदे, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संग्राम जाधव, जलसिंचन अधिकारी जे.बी. पाटील, सल्लागार अभियंता व्ही.जी.नलवडे, प्रदीप चव्हाण, उदय शेटे, शंकर सावंत, संभाजी नायकल, अरुण कदम, बाळासाहेब कदम, रघुनाथ यादव, रामचंद्र कदम, अशोक यादव, सुनिल कचरे, मधुकर कचरे, वसंतराव शिंदे, दिनकर शिंदे, सुरज तांबोळी, सचिव हौसेराव खोत यांच्यासह संस्थेचे संचालक, सात गावातील कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.












































































