Last Updated on 13 Mar 2025 9:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली : देशातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी भारत सरकारमार्फत प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना सुरु करण्यात आलेली आहे. याअंतर्गत देशातील 730 जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाणार आहे. योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख दि. 31 मार्च 2025 आहे. या योजनेचा पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त जमीर करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
सांगली जिल्ह्यासाठी राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टिलायझर लि., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि., रिलायन्स इंडस्ट्रीज लि., टाटा एआयजी जनरल इन्सुरन्स कंपनी लि., एचडीएफसी बँक लि., ज्युबिलंट फुडवर्क लि., हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., डीसीएम श्रीराम लि. बेयर क्रॉपसायन्स लि. या 10 कंपन्यांमधील 70 जागेच्या संधी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या आहेत, या योजनेचा लाभ 21 ते 24 वर्ष वयोगटातील उमेदवारांना दिला जाणार आहे. शिक्षण पूर्ण झालेल्या व कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या उमेदवारांसाठी आहे.
अर्ज कसा करावा – या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेबसाईटवर प्रोफाईल तयार करुन विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिप अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025आहे. याअंतर्गत उमेदवारांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. त्यासोबत दरमहा 5 हजार रुपये मिळतील. याशिवाय इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर 6 हजार रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते.
इंटर्नशिप संधीसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी करावी व प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, विजय नगर, सांगली, (दूरध्वनी क्र. ०२३३-२९९०३८३) येथे संपर्क साधावा, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Apr 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit Manifestation : आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरे असले,... Read more













































































