Last Updated on 10 Jul 2025 2:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांची माहिती
तालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत १५ जुलेला
सांगली । सन २०२५ ते सन २०३० या कालावधीसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण ६९६ ग्रामपंचायतीचे अनुसूचित जाती-8८३ जागा, अनुसूचित जमाती-०५ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग-१८८ जागा व खुल्या प्रवर्गासाठी-४२० जागासाठी सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यापैकी ५० टक्के जागांचे महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
यानुसार सांगली जिल्ह्यातील पुढीलप्रमाणे अनुसूची-१ व अनुसूची-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण ६९६ ग्रामपंचायतींचे सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुकानिहाय ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडतद्वारे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दिनांक ८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशानुसार मंगळवार, दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सबंधित तालुका स्तरावर तहसिलदार यांनी आरक्षण सोडत, उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पाडण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
म्हणून फेरआरक्षण…
दरम्यान, यापूर्वी २३ एप्रिल २०२५ रोजी आरक्षण निश्चित करण्यात आले होते. ते आरक्षण आता रद्द करण्यात आले आहे. राज्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये नियमानुसार आरक्षण निश्चित झाले नसल्यामुळे सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे फेरआरक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
तालुका एकूण : ग्रामपंचायती
मिरज : ६४
तासगांव : ६८
कवठेमहांकाळ : ५९
जत : ११६
खानापूर-विटा : ६४
आटपाडी : ५३
कडेगांव : ५४
पलूस : ३३
वाळवा : ९४
शिराळा : ९१
एकूण : ६९६


Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 22 Jun 2026 9:51 PM by Sanjay Patil/Adhorekhit राजारामबापू समूहाचा ‘पी.एम. सूर्यघर’ योजनेसाठी मोठा निर्णय सांगली । विजेच्या वाढत्या बिलाने सामान्य माणूस त्रस्त झाला असू... Read more












































































