Last Updated on 27 Oct 2024 11:48 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । शिवसेनेची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. कुडाळमधून निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २२ ऑक्टोबर रोजी शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
अक्कलकुआमधून आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बाळापूरमधून बळीराम शिरसकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांचा सामना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्याविरोधात असणार आहे. रिसोडमध्ये भावना गवळी यांना संधी देण्यात आली आहे. भावना गवळी यांना काही दिवसांपूर्वी विधान परिषदेची संधी देण्यात आली होती. यामध्ये त्या जिंकून आल्या होत्या. पण लोकसभेला त्यांना संधी न मिळाल्याने त्या नाराज असल्याची माहिती होती. विधान परिषदेची संधी देवून एकनाथ शिंदे यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. अखेर भावना गवळी यांना रिसोडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पूर्वमधून मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रिसोडमधून माजी खासदार भावना गवळी तर कुडाळमधून नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा – सम्राट महाडीक शिराळा मतदारसंघातून बंडखोरी करणार…
दुसऱ्या यादीतील उमेदवार……
१. आमशा पाडवी – अक्कलकुवा
२. बळिराम शिरसकर – बाळापूर
३. भावना गवळी – रिसोड
४. बाबुराव कोहळीकर – हडगाव
५. आनंद पाटील – नांदेड दक्षिण
६. आनंद भरोसे – परभणी
७. विलास तरे – बोईसर
८. शांताराम मोर- भिवंडी ग्रामीण
९. राजेंद्र गावीत – पालघर
१०. संतोष शेट्टी – भिवंडी पूर्व
११. विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम
१२. डॉ. बालाजी किणीकर – अंबरनाथ
१३. संजय निरूपम – दिंडोशी
१४. मुरजी पटेल- अंधेरी पूर्व
१५. तुकाराम काते – चेंबूर
१६. मिलिंद देवरा – वरळी
१७. विजय शिवतारे – पुरंदर
१८. निलेश राणे – कुडाळ
१९. राजेश क्षीर सागर – कोल्हापूर उत्तर
२०. सुवरणा कारंजे – विक्रोळी
हेही वाचा – काँग्रेसची चौथी यादी जाहीर, ‘यांना’ मिळाली संधी
पहिली यादी…………………………...
१. एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखडी
२. मंजुळा गावीत – साक्री
३. चंद्रकांत सोनवणे – चोपडा
४. गुलबरव पाटील -जळगाव ग्रामीण
५. अमोल पाटील – एरंडोल
६. किशोर पाटील – पाचोरा
७. चंद्रकांत पाटील -मुक्ताईनगर
८. संजय गायकवाड – बुलढाणा
९. डॉ. संजय रायमूलकर
१०. अभिजीत अडसूळ – दर्यापूर
११. आशीष जैस्वाल – रामटेक
१२. नरेंद्र भोंडेकर – भंडारा
१३. संजय राठोड – दीग्रस
१४. बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर
१५. संतोष बांगर – कळमनूरी
१६. अर्जुन खोतकर – जालना
१७. अब्दुल सत्तर – सीललोड
१८. प्रदीप जैस्वाल – छ. संभाजीनगर मध्य
१९. संजय शिरसाट- छ. संभाजीनगर पश्चिम
२०. विलास भूमरे – पैठण
२१. रमेश बोरनारे – वैजापूर
२२. सुहास कांदे – नांदगांव
२३. दादा भुसे – मालेगाव बाह्य
२४. प्रताप सरनाईक – ओवळा माजीवाडा
२५. प्रकाश सुर्वे – मागाठाणे
२६. मनीषा वायकर – जोगेश्वरी पूर्व
२७. दिलीप लांडे – चांदीवली
२८. मंगेश कुडाळकर – कुर्ला
२९. सदा सरवणकर – माहीम
३०. महेंद्र थोरवे – कर्जत
३१. यामिनी जाधव – भायखळा
३२. महेंद्र दळवी – अलिबाग
३३. भरत गोगवले – महाड
३४. द्यानराज चौगुले – उमरगा
३५. डॉ. तानाजी सावंत – परांडा
३६. शहाजी पाटील – सांगोला
३७. महेश शिंदे – कोरेगाव
३८. शंभुराज देसाई – पाटण
३९. योगेश कदम – दापोली
४०. उदय सामंत – रत्नागिरी
४१. किरण सामंत – राजापूर
४२. दीपक केसरकर – सावंतवाडी
४३. प्रकाश आबिटकर – राधानगरी
४४. चंद्रदीप नरके – करवीर
४५. सुहास बाबर – खानापूर







































































