Last Updated on 27 Oct 2024 6:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या मतदारसंघात आता भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शिराळा विधानसभेतील भाजपा नेते सम्राट महाडिक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार करणार आहेत. आज त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. उद्या (सोमवारी) अपक्ष अर्ज दाखल करणार आहे, अशी घोषणा सम्राट महाडीक यांनी केली.
भाजपने उमेदवारी न दिल्याने महाडीक यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.आज, रविवारी पेठ नाका येथे कार्यकर्ते महाडीक यांच्या निवासस्थांनी जमा झाले होते.. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सम्राट महाडीक व जिल्हा बँकेचे संचालक राहूल महाडीक यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवून, प्रमुख नेत्यांशी चर्चा करुन शिराळा व इस्लामपूर मतदारसंघातील आपली भुमिका स्पष्ट करु असे सांगितले अनेक कार्यकर्त्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. जेष्ठ नेते सी. बी. पाटील, हणमंत माळी, स्वरुप पाटील, जयसिंगराव शिंदे, माजी नगरसेवल कपील ओसवाल, सतीश महाडीक, केदार नलवडे, चेतन शिंदे, अमित ओसवाल, डॉ.सचिन पाटील, राजन महाडीक, सतीश पाटील, बबन शिंदे, मानसिंग पाटील(बहे), इसाक वलांडकर, राहूल कदम, बंटी अग्रवाल, सनी खराडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्यानंतर भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी माध्यमांना आपली भूमिका सांगितली. सम्राट महाडिक म्हणाले, आज झालेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. गेल्या दहा वर्षापासून आम्ही आणि आमचे कार्यकर्ते या मतदारसंघात काम करत आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी भाजपाची राज्यात सत्ता नसताना आम्ही भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आम्हाला पक्षश्रेष्ठींना तिकीट देण्याचा शब्द दिला होता. त्यावर आम्ही प्रवेश केला, पाच वर्षात आम्ही पक्ष वाढवण्याचे काम केले. शब्द पाळला नसल्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा तीव्र आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला आहे. यापुढे आम्ही कोणाची ओझी उचलणार नाही. जे काही करायचे ते आता स्वतःच्या ताकदीवर करुन आमची ताकत दाखवून देवू. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेवून मी शिराळा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहे. उद्या आम्ही अपक्ष अर्ज दाखल करणार आहे अशी घोषणा भाजपचे शिराळा मतदारसंघ प्रमुख सम्राट महाडीक यांनी केली.
सम्राट महाडीक म्हणाले , राज्यात सत्ता नसताना आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला. प्रवेशावेळी आम्हाला शिराळा मतदारसंघातून उमेवारी देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी दिला होता. त्यामुळे गेली पाच वर्षे आम्ही लढण्याची तयारी केली. पक्षाचे काम घराघरात पोहोचविले. त्यामुळे पक्षाने आम्हाला विचारात घेवून येथील निर्णय घ्यायला हवा होता. भाजप नेत्यांनी नुसती आश्वासने दिली.आम्हाला महामंडळ, विधान परीषद नको. फक्त शिराळ्यातून उमेदवारी द्या एवढीच आमची मागणी होती. कोल्हापूरकडे बोट दाखवून कोण आम्हाला थांबत असेल तर आम्ही थांबणार नाही.
इस्लामपूरचा निर्णय चर्चा करुन…

राहूल महाडीक म्हणाले, शिराळ्यात उमेदवारी मिळेल म्हणून आम्ही इस्लामपूर मतदार संघावरील हक्क सोडला होता. पक्षाने दोन्हीकडील उमेदवार घोषीत करताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे इस्लामपूर मतदार संघातील आमचा निर्णय आ. सदाभाऊ खोत, शिवसेनेचे आनंदराव पवार, गौरव नायकवडी, भाजपचे विक्रम पाटील यांच्याशी चर्चा करुन लवकरच घेवू.














































































